भारताचा सच्चा मित्र, PM मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर पंतप्रधानांसह 200 मान्यवर हजर

हिंद महासागर क्षेत्रातील एका देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज अत्यंत भव्य, अभूतपूर्व असं स्वागत करतण्यात आलं. मोदी येणार म्हणून त्या देशाचे पंतप्रधान, उप पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, संसदेचे अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, परराष्ट्र मंत्री, कॅबिनेट सचिव आणि एकूण 200 जण जातीने विमानतळावर उपस्थित होते.

भारताचा सच्चा मित्र, PM मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर पंतप्रधानांसह 200 मान्यवर हजर
PM Narendra Modi
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 11, 2025 | 10:20 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच आज मॉरीशसमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. ते आजपासून मॉरीशस दौर्‍यावर आहेत. पोर्ट लुईस येथे मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं. पंतप्रधान मोदींच मॉरीशसमधील विमानतळावर अभूतपूर्व असं स्वागत करण्यात आलं. स्वत: मॉरीशेसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांच्यासह 200 मान्यवर पीएम मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. मॉरीशसचे उप पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, मॉरीशेसच्या संसदेचे अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, परराष्ट्र मंत्री, कॅबिनेट सचिव आणि अन्य मान्यवर मोदींच्या स्वागतसाठी जातीने विमानतळावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय मॉरीशस दौऱ्यावर आले आहेत. मॉरीशस हा बेटावरील एक देश आहे. त्यांच्या राष्ट्रीय दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये पीएम मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. देशाच्या सर्वोच्च नेत्यांबरोबर मोदी यांच्या भेटीगाठी आणि चर्चा होणार आहेत.

मॉरीशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांच्या निमंत्रणावरुन मोदी तिथे गेले आहेत. मोदींच्या या दोन दिवसीय दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये व्यापार सहकार्य वाढवण्यासंबंधी आणि आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी अनेक करार होतील. या दौऱ्याने दोन्ही देशांमध्ये एक नवीन अध्याय सुरु होईल असं पीएम मोदी मॉरीशसला रवाना होण्यापूर्वी सोमवारी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉरीशसचे पंतप्रधान, अन्य मान्यवर आणि तिथल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतील. मोदी तिथल्या भारतीस समुदायासोबत चर्चा करतील. तिथे वेगवेगळ्या प्रकल्पाच उद्घाटन करतील. भारताच्या सहकार्याने तिथे काही प्रकल्प आकाराला आले आहेत.

हिंद महासागर क्षेत्रातील भारताचा विश्वासू सहकारी

“दोन्ही देशातील नागरिकांची प्रगती आणि समृद्धीसाठी मैत्री संबंध भक्कम करण्याचा प्रयत्न राहणार आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातून निघण्याआधी म्हटलं होतं. बुधवारी भारतीय सशस्त्र दलाची पथक सुद्धा मॉरीशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात आपल्या कौशल्याच सादरीकरण करणार आहेत. भारतीय नौदलाची युद्धनौका आणि इंडियन एअर फोर्सची आकाश गंगा टीम आपलं नैपुण्य दाखवून देतील. मॉरीशेस हा हिंद महासागर क्षेत्रातील भारताचा विश्वासू सहकारी आहे. आफ्रिका खंडातील भारताच ते प्रवेशद्वार आहे.