AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Israel Friendship : भारताला सोबत घेऊन इस्रायली पीएम नेतन्याहू बनवतायत खतरनाक प्लान, पाकिस्तानचे नक्कीच धाबे दणाणणार

India-Israel Friendship : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बुधवारी दोन दिवसाच्या इस्रायल दौऱ्यावर जात आहेत. हा दौरा खास आहे. इस्रायलमध्ये हेक्सागन ऑफ अलायंस प्लानवर काम सुरु आहे. हा प्लान काय आहे? पाकिस्तानचं टेन्शन का वाढणार? ते समजून घ्या.

India-Israel Friendship : भारताला सोबत घेऊन इस्रायली पीएम नेतन्याहू बनवतायत खतरनाक प्लान,  पाकिस्तानचे नक्कीच धाबे दणाणणार
India-Israel Friendship
| Updated on: Feb 24, 2026 | 2:02 PM
Share

भारतासाठी हा आठवडा महत्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसाच्या इस्रायल दौऱ्यावर जात आहेत. ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. इस्रायली पंतप्रधानांनी मोदींना प्रेमळ मित्रं म्हटलं. दोन्ही देशांमध्ये संबंध भक्कम होत असल्याचं सांगितलं. “कॅबिनेट मीटिंगच्या सुरुवातीलाच मी माझे जवळचे नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक दौऱ्याबद्दल बोललो. इस्रायल आणि भारत इनोवेश, सिक्योरिटी आणि स्ट्रॅटजिक विजनमध्ये पार्टनर आहेत” असं नेतन्याहू यांनी X वर लिहिलय. इस्रायल पश्चिम आशियामधील मित्र देशांचं नेटवर्क बनवण्याच्या योजनेवर काम करत असल्याची सुद्धा नेतन्याहू यांनी घोषणा केली. त्यानी या आघाडीला ‘हेक्सागन ऑफ अलायंसेस’ नाव दिलं आहे. कट्टरपंथी शत्रू विरोधात लढण्याच्या उद्देशाने ही आघाडी उभी करण्यात येत आहे.

हेक्सागन ऑफ अलायंस ही सहादेशांची एक संघटना असेल, ज्यात पश्चिम आशिया आणि त्याच्या आसपासचे देश सहभागी होतील. भारत, ग्रीस, सायप्रस, अरब, आफ्रिकी आणि आशियाई देश या आघाडीत असतील. टाइम्स ऑफ इस्रायलनुसार, नेतन्याहू म्हणाले की, “माझ्या समोर जे विजन आहे, त्यानुसार आम्ही एक पूर्ण सिस्टिम बनवू. आव्हान, लक्ष्य आणि कट्टरपंथीय विचारधारा यांच्या विरोधात एकसारखी विचार असलेले देश यामध्ये असतील” निश्चितच ही आघाडी कट्टरपंथीय विचारधारेला, दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला महाग पडेल.

या आघाडीचे अन्य उद्देश काय?

ही आघाडी IMEC इंडिया मिडिल ईस्ट-यूरोप इकोनॉमिक कॉरिडोर सारखी असेल. याचा उद्देश कनेक्टिविटी वाढवून इकोनॉमिक डेवलपमेंटला प्रोत्साहन देणं सुद्धा आहे. ही आघाडी आर्थिक सहकार्य, कूटनितीक समन्वय आणि सुरक्षा सहकार्य यात समन्वय साधेल. प्रस्तावित आघाडी इराणला उत्तर देण्याच्या दृष्टीने असेल. नेतन्याहू शिया एक्सिस विरोधात विजय मिळवण्याचा प्रयत्न करतायत असं जाणकारांनी सांगितलं. याकडे एक्सिस ऑफ रेसिस्टेंस म्हणूनही पाहिलं जातय.

हेक्सागन ऑफ अलायंसेसमध्ये सहभागी होण्यात भारतासमोर आव्हान काय?

भारतासाठी हेक्सागन ऑफ अलायंसेसमध्ये संधी आणि अडचण दोन्ही आहे. स्ट्रेटेजिक दृष्टीने पश्चिम आशियात भारताचं स्थान अजून बळकट होईल. डिफेंस आणि नवीन टेक्नोलॉजी मिळेल. IMEC सारखे कनेक्टिविटी प्रोजेक्ट्स बरोबर जोडले जाऊ. कूटनितीक दृष्टीने अरब देशांसोबत भारताचे जुने संबंध आहेत. इराणसोबतही भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अरब, इराण हे इस्रायलचे कट्टर विरोधक आहेत. यात बॅलन्स साधण्याचे आव्हान भारतासमोर असेल.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...