मोदींच्या भाषणानंतर चवताळलेल्या इम्रान खानचा UN मध्ये ‘उन्माद’

इम्रान खान यांनी आग ओकत भारतावर गंभीर आरोप केले. मोदींनी (PM Narendra Modi UNGA) त्यांच्या भाषणात पाकिस्तानचं नाव न घेता दहशतवादावर भाष्ट केलं. यासह विविध विषयावर मोदींनी जगाला संदेश दिला.

मोदींच्या भाषणानंतर चवताळलेल्या इम्रान खानचा UN मध्ये 'उन्माद'
Follow us
| Updated on: Sep 27, 2019 | 10:01 PM

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (PM Narendra Modi UNGA) 74 व्या सत्राला संबोधित करताना जगाला दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं भाषण झालं. पण इम्रान खान यांनी आग ओकत भारतावर गंभीर आरोप केले. मोदींनी (PM Narendra Modi UNGA) त्यांच्या भाषणात पाकिस्तानचं नाव न घेता दहशतवादावर भाष्ट केलं. यासह विविध विषयावर मोदींनी जगाला संदेश दिला.

पंतप्रधान मोदींनी हवामान बदल, आरोग्य यासह भारताच्या विकासावरही भाष्य केलं. यासोबतच त्यांनी दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या शक्तींवर हल्लाबोल केला. दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाने एकवटणं ही काळाची गरज आहे. विखुरलेलं जग कुणाच्याही हिताचं नाही. आपल्या सर्वांना संयुक्त राष्ट्राला नवी दिशा द्यावी लागेल, असं मोदींनी सांगितलं. भारताने जगाला युद्ध नाही, तर बुद्ध दिले, असं मोदी म्हणाले.

इम्रान खानचा थयथयाट

मोदींच्या भाषणानंतर इम्रान खानचं भाषण झालं. इम्रान खानच्या भाषणात पुन्हा एकदा उन्माद दिसून आला. काश्मीरमध्ये सध्याच्या परिस्थितीमुळे तरुण हातात शस्त्र घेण्यासाठी प्रेरित होतील. काश्मीरमधील परिस्थितीचा प्रभाव जगातील 1.3 अब्ज मुस्लिमांवरही होईल, असं वक्तव्य इम्रान खानने केलं. यासोबतच काश्मीरमधील जमावबंदी उठवताच हिंसाचार होणार असल्याचं भाकीतही इम्रान खानने केलं.

यासोबतच इम्रान खानने पुन्हा एकदा अणुयुद्धाची धमकी दिली. आपण अणुयुद्धाच्या दिशेने वाटचाल करत असू तर याला यूएन जबाबदार असेल. याचसाठी 1945 मध्ये यूएनची स्थापना झाली होती. तुम्हाला हे रोखावंच लागेल. दोन देशांमध्ये पारंपरिक युद्ध सुरु होतं तेव्हा काहीही होऊ शकतं. पण एक शेजारी देश त्याच्या शेजाऱ्यापेक्षा सात पट छोटा असेल तर त्यांच्याकडे काय पर्याय असेल याचा तुम्ही विचार करा. स्वतः समर्पण करणं किंवा युद्धात मरणं हा पर्याय असेल.

भारत ‘राईट टू रिप्लाय’ वापरणार

इम्रान खानने केलेल्या गंभीर आरोपांना उत्तर देण्यासाठी भारत संयुक्त राष्ट्रात उत्तराचा अधिकार वापरणार आहे. या अधिकारातून भारत पाकिस्तानच्या भाषणाला उत्तर देईल.

VIDEO : मोदींचं संपूर्ण भाषण

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.