AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मूळ भारतीय महिलेला मिळाली न्यूयार्क पोलीसमध्ये टॉप रँक, सांगितले कसे मिळाले यश?

कामाप्रती असलेलं समर्पण पाहून त्यांना कॅप्टन पदावर बढती देण्यात आली. पंजाब येथे प्रतिमा यांचा जन्म झाला होता. ९ वर्षांपर्यंत त्या पंजाब येथे होत्या. त्यानंतर त्या न्यूयार्कमध्ये गेल्या.

मूळ भारतीय महिलेला मिळाली न्यूयार्क पोलीसमध्ये टॉप रँक, सांगितले कसे मिळाले यश?
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: May 18, 2023 | 8:30 PM
Share

न्यूयार्क : कॅप्टन प्रतिमा भुल्लर माल्डोनाडो एक मूळ भारतीय महिला अधिकारी. प्रतिमा भुल्लर यांना न्यूयार्क पोलिसांनी कॅप्टन पदावर बढती दिली आहे. या प्रमोशनमुळे त्या हायस्ट रँकिंगच्या साऊथ आशियन महिला झाल्या आहेत. सीबीएस रिपोर्टनुसार ही बातमी समोर आली. प्रतिमा भुल्लर यांना मागील महिन्यात प्रमोशन मिळाले. प्रतिमा यांना चार मुलं आहेत. कामाप्रती असलेलं समर्पण पाहून त्यांना कॅप्टन पदावर बढती देण्यात आली. पंजाब येथे प्रतिमा यांचा जन्म झाला होता. ९ वर्षांपर्यंत त्या पंजाब येथे होत्या. त्यानंतर त्या न्यूयार्कमध्ये गेल्या.

लहान असताना जात होत्या गुरुद्वारात

माल्डोनाडो यांनी सांगितले की, त्यांच्यासाठी प्रमोशन घरवापसीसारखा आहे. लहान असताना त्या स्थानिक गुरुद्वारात जात होत्या. आता कॅप्टनही गुरुद्वारात जाणार आहे. हा विचार करून त्या आनंदी झाल्या. त्यांचे नवे पद सामूदायिक पोलिसिंगला मदत करेल.

या भागात भाषेचा अडथळा

माल्डोनाडो यांनी सांगितलं की, या भागात भाषेचा अडथळा येत आहे. कारण बहुतेक लोकं इंग्रजीला सेकंड लँगवेज समजतात. माल्डोनाडो न्यूयार्क पोलीस विभागाची पहिली साऊथ आशियन महिला आहे जी या पदापर्यंत पोहचली. कॅप्टन हे पद जबाबदारीचे पद आहे. ही खूप मोठी जबाबदारी असल्याचे माल्डोनाडो यांनी म्हंटलं.

उत्तुंग शिखरावर पोहचल्या

या पदावरून त्या चांगले आणि पॉझिटिव्ह उदाहरण देऊ इच्छितात. काही मुलं त्यांचं काम रोज पाहत असतात. काही महिला त्यांच्या आजूबाजूला आहेत. या समुदायासाठी माल्डोनाडो या उत्तुंग यशाच्या शिखरावर पोहचल्या आहेत. महिलांना त्या एक संदेश देऊ इच्छितात. त्या दक्षिण आशिया देशातून आलेल्या आहेत.

मेहनत आणि सातत्यामुळे यश

मेहनत आणि सातत्यामुळे त्यांना हे यश मिळाले आहे. ही त्यांच्या यशाची पायरी आहे. मुळ भारतीय महिलेने न्यूयार्क पोलीस डिपार्टमेंटमध्ये प्रमोशन मिळवलं. त्यांना कॅप्टन बनवण्यात आलं. या पदापर्यंत पोहचणाऱ्या त्या दक्षिण आशियातील पहिल्या महिला आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?