
भारत आणि अमेरिकेत टॅरिफवरून तणाव आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर टीका करताना दिसत आहे. त्यांनी भारताची सुटका टॅरिफमधून होणार नसल्याचे स्पष्ट केले. यासोबतच दिल्ली येथे होणाऱ्या व्यापार करारची बैठक अमेरिकेकडून रद्द करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारताच्या विरोधात आग ओकत आहेत. या टॅरिफ वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. शेवटी आता नरेंद्र मोदी यांनी भाष्य करत मोठा संदेश डोनाल्ड ट्रम्प यांना दिलाय. पंतप्रधानांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले की, अमेरिकेने कितीही दबाव टाकला तरीही भारत झुकणार नाहीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅरिफच्या मुद्दावरून अमेरिकेची मोठी कोंडी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होताना दिसतंय. नरेंद्र मोदी हे आज दिल्ली एनसीआर येथील राजमार्गाचे उद्धाटन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळीच्या भाषणात त्यांनी म्हटले की, तुम्ही भारताचेच प्रोडक्ट खरेदी करा. आपल्या देशात बनलेल्या स्वदेशी वस्तूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या. वोकल फॉर लोकल मंत्रासाठी माझी साथ द्या आणि याच्यासोबत उभे राहा.
11 वर्षापूर्वी आपण जास्त करून फोन इंपोर्ट करत होतो. आज जास्त करून भारतीय मेड इन इंडिया फोन वापरतात. आपण लोक 35 करोड मोबाईल बनवत आहोत. विशेष म्हणजे याला एक्सपोर्ट देखील केले जाणार आहे. आता भारताने अमेरिकेच्या टॅरिफ विरोधात मोठा डाव टाकल्याचे बघायला मिळतंय. भारतीय बाजारपेठेत अमेरिकन कंपन्या मोठ्या प्रमाणात अजून मोठी उलाढाल करतात. आता त्याच कंपन्यांचे कंबरडे मोडण्यासाठी हा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या नव्या नाऱ्यानंतर भारतात असलेल्या अमेरिकन कंपन्यांवर थेट परिणाम होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी थेट लोकांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्यास सांगितले आहे. हा एकप्रकारे अमेरिकाला मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. भारताने अमेरिकेच्या टॅरिफच्या कोणत्याही अटी अजून मान्य केल्या नाहीत. तो अमेरिका मोठा धक्का असतानाच आता भारताने अमेरिकेच्या टॅरिफच्या विरोधात मोठा नारा दिला आहे. अमेरिकेचा गेम त्यांच्यावरच उलटा पडल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. आता यावर डोनाल्ड ट्रम्प हे काय बोलतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.