डोनाल्ड ट्रम्प- पुतिन यांच्या भेटीतील गुप्त कागदपत्रे लीक, सुरक्षेत मोठी चूक, ट्रम्प यांच्याकडून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना ‘हे’ गिफ्ट
डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांची भेट 15 ऑगस्ट रोजी झाली असून या भेटीसंदर्भातील गुप्त माहिती आणि काही कागदपत्रे लीक झाली आहेत. भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफच्या मुद्दावरून तणावाचे वातावरण असताना ही भेट झाली. या भेटीबद्दल आता मोठी माहिती पुढे आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात बैठक झाली. ही बैठक युक्रेनच्या युद्धासंदर्भात होती. मात्र, या बैठकीतून काहीच निर्णय होऊ शकला नाहीये. मात्र, आता या बैठकीबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे आलीये. या बैठकीनंतर पुतिन यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून खास गिफ्ट देण्याचे नियोजन होते. हेच नाही तर या बैठकीची संपूर्ण माहिती लिक झाली आहे. न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, पुतिन आणि ट्रम्प यांच्यातील बैठकीपूर्वी त्यांच्या भेटीसंदर्भातील गुप्त कागदपत्रे हॉटेलच्या प्रिंटरवर तशीच राहिली. यामध्ये काही संवेदनशिल माहिती देखील होती.
या अहवालात स्पष्ट म्हणण्यात आले की, फोर स्टार हॉटेल कॅप्टन कुकच्या प्रिंटरवर महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. या कागदपत्रांमध्ये पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या जेवणासाठी मेन्सू देखील होता. ब्रँडी, पेपरकॉर्न सॉस आणि मांसाच्या तुकड्यांसह सॅलड दिले जाईल. मेनूमध्ये एक क्रिमी बटाट्या डिश आणि शतावरीचा देखील समावेश होता. स्पेशल माशाची खास डिश पुतिन यांच्यासाठी होती. दोघांच्या लंचची पूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र, पुतिन हे जेवन न करताच बैठकीनंतर निघून गेले.
पुतिन यांच्या स्वागतासाठी अमेरिकेकडून खास नियोजन केले होते. याशिवाय, बोर्डरूम स्टाईल टेबल सेटिंगचाही त्यात उल्लेख होता. राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या सहाय्यकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वकाही नियोजित होते. बाकी या बैठकीमध्ये कोण कोण सहभागी होणार यांचीही नावे त्या गुप्त कागदपत्रांवर आहेत. यासोबतच या कागदपत्रांमध्ये बैठकीसाठी उपस्थित अधिकाऱ्यांना काही सूचना देखील देण्यात आल्या होत्या.
कागदपत्रातील माहितीनुसार, या बैठकीनंतर पुतिन यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांना खास गिफ्ट दिले जाणार होते. ट्रम्प पुतिन यांना एक मुर्ती भेटवस्तू देणार होते. मात्र, दोघांमधील भेटीनंतर त्यांना ही मुर्ती गिफ्ट दिली की नाहीये, याबद्दल काही माहिती कळू शकली नाहीये. मात्र, या कागदपत्रांवर भेटीचे सर्व नियोजन आहे, त्यामध्ये या मूर्तीबद्दल देखील उल्लेख करण्यात आला आहे. फक्त हेच नाही तर मिळालेल्या कागदपत्रांमध्ये अमेकिरेच्या काही अधिकाऱ्यांचे फोन नंबर देखील आहेत.
