AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट दिलं मेलोडी चॉकलेट… ट्विट करताच व्हिडीओ झाला क्षणार्धात व्हायरल

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटली दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान व्दिपक्षीय चर्चा होईल. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मोदींनी खास गिफ्ट इटलीच्या पंतप्रधानांना दिले.

पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट दिलं मेलोडी चॉकलेट... ट्विट करताच व्हिडीओ झाला क्षणार्धात व्हायरल
Giorgia Meloni and Narendra Modi
| Updated on: May 20, 2026 | 1:13 PM
Share

पुढील एक वर्ष सोने न खरेदी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेला करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दाैऱ्यावर आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात त्यांच्या या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा आहेत. इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसत आहे. केंद्र सरकार एका मागून एक मोठे निर्णय घेत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपियन देशांना भेट देत आहेत. व्दिपक्षीय चर्चा करत आहेत. आता नरेंद्र मोदी इटलीला पोहोचले आहेत. इटलीमध्ये त्यांचे खास स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सुत्रे आपल्या हातात घेतल्यापासून भारत आणि इटलीमधील संबंध सुधारली आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदी इटलीमध्ये पोहोचताच खास सेल्फी शेअर केला.

यासोबतच माझ्या मित्राचे स्वागत असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इटलीच्या दाैऱ्याचे विशेष निमंत्रण दिले होते. त्यानंतर ते इटलीच्या दाैऱ्यावर गेले. आता यादरम्यानच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जॉर्जिया मेलोनी यांना खास गिफ्ट देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना थेट मेलोडी चॉकलेट गिफ्ट दिले आहेत. मेलोडी चॉकलेटचा पुडा मोदींनी गिफ्ट म्हणून जॉर्जिया मेलोनी यांना दिला. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मोदी जॉर्जिया मेलोनी यांना चॉकलेट गिफ्ट देताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले हे गिफ्ट जॉर्जिया मेलोनी यांनीही आनंदाने घेतल्याचे दिसत आहे. भारत आणि इटलीमध्ये आज व्दिपक्षीय बैठक होईल. ज्यामध्ये काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ