AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला मोठा झटका! थेट अमेरिकेच्या संसदेत भारताविरोधात प्रस्ताव, टॅरिफसह निर्बंध..

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. मात्र, यादरम्यानच भारतासह चीनच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अमेरिकेच्या संसदेत धक्कादायक प्रस्ताव ठेवण्यात आला. ज्याने भारताची झोप उडाली आहे.

भारताला मोठा झटका! थेट अमेरिकेच्या संसदेत भारताविरोधात प्रस्ताव, टॅरिफसह निर्बंध..
America Parliament
| Updated on: Jul 16, 2026 | 8:56 AM
Share

गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेची दादागिरी जगात वाढली आहे. एखाद्या देशाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही की, लगेचच मोठा टॅरिफ लावला जातो. कोणाकडून काय खरेदी करायचे आणि काय नाही हा प्रश्न ज्या त्या देशाचा आहे. पण नाही अमेरिका ठरवणार की कोण कोणत्या देशाकडून काय खरेदी करणार. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला होता. त्यामध्येच अमेरिकेच्या संसदेत मोठे बिल मांडण्यात आले. ज्यामध्ये रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतावर मोठे निर्बंध लादण्याची मागणी करण्यात आली. भारतासोबतच यात अजून काही देशांच्या समावेश आहे. भारत, चीन, स्लोवाकिया, हंगरी आणि अजरबैजान या देशांवर रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने 100 टक्के टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. याचा मुख्य उद्धेश की, रशियाकडून कोणीही तेल खरेदी करू नये.

हे बिल एप्रिल 2025 सीनेटमध्ये आणले होते. पहिल्या बिलात 500 टक्के टॅरिफचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, त्याला मंजुरी मिळू शकली नाही. त्यामुळे हा टॅरिफ कमी करून 100 टक्के करण्यात आला. भारत, चीन, स्लोवाकिया, हंगरी आणि अजरबैजान हे देश रशियाचे तेल खरेदी करणारे मोठे खरेदीदार आहेत. अमेरिकेने टॅरिफचे शस्त्र येण्यापूर्वी भारत रशियाकडून तेल खरेदीचे रेकॉर्ड तयार करत आहे.

होर्मुज खाडी बंद असल्याने भारताला रशियाकडून तेल खरेदी केल्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने रशियावरील निर्बंध हटवले आहेत. कारण इराण आणि अमेरिका युद्धात जगात ऊर्जेचे संकट निर्माण झाले. त्यामुळे काही दिवसांकरिता रशियावरील तेलाचे निर्बंध अमेरिकेने हटवले.

यापूर्वीही अमेरिकेने भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ लावला होता. या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात होते. त्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यानंतर हा टॅरिफ कमी करण्यात आला. त्यामध्येच आता पुन्हा एकदा टॅरिफ लावण्याबद्दल पाऊले उचलली जात आहेत.

Follow Us
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा;
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा; मुख्यमंत्र्यांशीही चर्चा
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम, 21 फेऱ्यांनंतर निकाल जवळपास निश्चित
कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
Kaustubh Gawade : कमी वय, मोठी संधी अन् विजय, कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... शिक्षक नेते...
Maharashtra MLC Election 2026 Result : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... सचिन सानप काय म्हणाले?
कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत...
Kaustubh Gawde MLC Result : कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत गुलालाची उधळण
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून...
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून दिलं प्रत्युत्तर?
पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
जाधव विरुद्ध जाधव; कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष