मोठी बातमी! कतारमधील 7 लाख भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धोका वाढला

इराणने कतारवर केलेल्या हल्ल्यानंतर कतारमध्ये राहणाऱ्या सुमारे 7 लाख भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

मोठी बातमी! कतारमधील 7 लाख भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धोका वाढला
कतारमधील 7 लाख भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 24, 2025 | 4:14 PM

इराण-इस्रायल युद्धामुळे युद्धाचे ढग दाटून आले आहेत. त्यात कतारमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर कतारमधील भारतीय दूतावासाने भारतीयांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता कतारमधील भारतीय समुदायाला सतर्क राहण्याचे आणि घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इराणने कतारवर केलेल्या हल्ल्यानंतर कतारमध्ये राहणाऱ्या सुमारे 7 लाख भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कतारमधील इतर कोणत्याही परदेशी समुदायापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. याविषयी पुढे विस्ताराने जाणून घ्या.

इराणने कतारची राजधानी वर केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण मध्यपूर्वेत भीतीचे वातावरण आहे. पण भारतासाठी ही चिंतेची बाब बनली आहे. मध्यपूर्वेतील जवळजवळ प्रत्येक देशात भारतीय राहतात, कतार आखाती देशांमध्ये आहे जिथे सर्वात जास्त भारतीय राहतात.

कतारमध्ये सुमारे 7 लाख भारतीय राहतात. जी कतारमधील कोणत्याही परदेशी समुदायाची सर्वात मोठी संख्या आहे. येथील भारतीय वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, वित्त, व्यवसाय आणि ब्लू कॉलर नोकऱ्यांसह विविध व्यवसायात गुंतलेले आहेत. कतारचे भारत सरकारशीही चांगले संबंध आहेत. कतारवरील हल्ल्यामुळे भारतीयांची चिंताही वाढली आहे.

भारतीय दूतावासाने बजावली नोटीस

या हल्ल्यानंतर कतारमधील भारतीय दूतावासाने भारतीयांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता कतारमधील भारतीय समुदायाला सतर्क राहण्याचे आणि घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कृपया शांत रहा आणि कतारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्थानिक बातम्या, सूचना आणि मार्गदर्शनाचे अनुसरण करा. दूतावास आमच्या सोशल मीडिया चॅनेलच्या माध्यमातून ही माहिती देत राहील.

कतारवर इराणचा हल्ला

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने कतारमधील अमेरिकेच्या अल-उदीद तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला असून वॉशिंग्टनने इराणच्या अणुप्रकल्पांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले आहे. इराणच्या सार्वभौमत्वाविरोधात भविष्यात कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा आयआरजीसीने एका निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, कतारने हा हल्ला आपल्या सार्वभौमत्वाचा भंग असल्याचे म्हटले असून त्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवला असल्याचे म्हटले आहे.

13 जूनपासून युद्ध सुरु

इस्त्रायल आणि इराण दरम्यान 13 जूनपासून युद्ध सुरु झाले आहे. या युद्धात इराणचे तीन प्रमुख अणू प्रकल्प फोर्डो, नतांज आणि इस्फहानवर अमेरिकेने बंकर बस्टरने हल्ले केले. इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामीसह इतर सैन्य कमांडर्स आणि अणूशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला. तसेच इराणमधील जवळपास एक हजार जणांचा मृत्यू झाला. इराणमधील पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले. या युद्धात इराणला कोणाचीही सोबत मिळाली नाही. चीन-रशियासारख्या देशांनी नैतिक पाठिंबा दिला. परंतु उघडपणे या दोन्ही देशांनी इराणला पाठिंबा दिला नाही.