AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनने भारतीय वाघांना डिवचलं, भारत-चीन वादावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिक्रिया

भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षानंतर जगभरातील माध्यमांचं या घटनाक्रमाकडे लक्ष आहे (International Media on Galwan Valley Face off).

चीनने भारतीय वाघांना डिवचलं, भारत-चीन वादावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिक्रिया
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 17, 2020 | 5:56 PM
Share

नवी दिल्ली : भारत-चीन सैन्यात गलवान खोऱ्यावरुन झालेल्या संघर्ष भारताचे 20 जवान शहीद झाले. सुरुवातीला 1 कर्नल आणि दोन जवान या संघर्षात शहीद झाल्याची बातमी होती. मात्र, नंतर ही संख्या वाढली. काल (मंगळवार, 16 जून) रात्री उशिरा भारतीय सैन्याने अधिकृत माहिती देत 20 जवान शहीद झाल्याचं सांगितलं. या घटनेनंतर जगभरातील माध्यमांचं यावर लक्ष आहे (International Media on Galwan Valley Face off). जागतिक माध्यमांनी या घटनेचं वर्णन करताना चीनने भारतीय वाघांना डिवचल्याचं म्हटलं आहे.

या संघर्षात भारतीय सैन्याने दिलेल्या उत्तरात चीनचे देखील 35-40 सैनिक मारले गेल्याचं वृत्त अनेक माध्यम संस्थांनी दिलं आहे. मात्र, अद्याप याचा अधिकृत आकडा चीनकडून जाहीर करण्यात आलेला नाही. या घटनेकडे आंतरराष्ट्रीय माध्यमांचंही लक्ष आहे. यावर वेगवेगळ्या माध्यमांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे.

इंडिपेंडन्ट

इंडिपेंडन्ट वृत्तपत्रात लिहिलं आहे, “2017 मध्ये डोकलामच्या (Doklam Dispute) मुद्द्यावरुन झालेल्या संघर्षानंतर भारत-चीनमध्ये आता तयार झालेला तणाव गंभीर स्थितीत आहे. संरक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चीनला या संघर्षानंतर 60 चौरस किलोमीटर जमीन मिळाली आहे. आजच्या तणावाच्या स्थितीला चीनकडून जमिनीवर गुपचूप ताबा घेण्यापासून झाली. त्यामुळे जोपर्यंत चीनचं सैन्य मागे हटत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संघर्ष होण्याचा धोका अधिक आहे.”

एबीसी

एबीसी वृत्तपत्रात भारतीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हटलं आहे, “सीमेवर झालेल्या संघर्षात भारतीय सैनिकांवर लोखंडी सळी आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. मात्र, या दरम्यान गोळीबार झाला नाही. चीनी सैनिकांनी लोखंडी सळीने हल्ला केला. यात भारतीय कमांडिंग अधिकारी गंभीर जखमी झाले. यानंतर चिनी सैनिकांनी झुंडीत भारतीय सैन्यावर दगडफेक केली.”

सीमेवरील तणावाला चीनचं आक्रमक धोरण जबाबदार : गार्डिअन

गार्डिअन (Guardian) वृत्तपत्रात लिहिलं आहे, “दोन अण्वस्त्रधारी देशांनी एकमेकांवर दगडांनी हल्ला केला. हे चीनच्या सीमेंविषयीच्या आक्रमक धोरमाचा परिणाम असल्याचं दिसतं आहे.”

वाशिंग्टन पोस्टमध्ये म्हटलं आहे, “अनेक वर्षांपासून शांततापूर्ण मार्गाने सीमाप्रश्न हाताळणाऱ्या मोठी लोकसंख्या असलेल्या दोन देशांमध्ये संघर्ष झाला आहे. सैनिकांच्या या संघर्षामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. दोन्ही बाजूने 1975 नंतर सीमा प्रश्नावरुन एकही सैनिक मारला गेला नव्हता.”

अलजजीरात भारताच्या बाजूला प्राधान्य देत म्हटलं, “भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. मात्र, भारताने देशाची भौगोलिक अखंडता आणि सार्वभौमता कायम ठेवण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे.”

वॉशिंग्टन एग्जामिनरमध्ये पत्रकार टॉम रोगन यांच्या लेखात म्हटलं आहे, “चीनने या हिंस्र संघर्षातून भारतीय वाघांना (‘इंडियन नेशनलिस्ट टाइगर’) डिवचलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवेदनशील व्यक्ती आहेत. ते भारतीयांच्या भावनांशी जोडलेले आहेत.”

संबंधित बातम्या :

Rahul Gandhi asks PM | पंतप्रधान गप्प का? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी? राहुल गांधी यांची प्रश्नांची सरबत्ती

PM Modi on Ladakh face-off | जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, उत्तर देण्यास भारत सक्षम : पंतप्रधान मोदी

LAC Face-off Live Updates : भारत जशास तसं उत्तर देण्यास सक्षम : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

India China Face off | पंतप्रधानांकडून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन, चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा

एका- एका जवानाला तिघांनी घेरले, तरीही भारतीय वीर भिडले, गलवान खोऱ्यातील थराराची इनसाईड स्टोरी

संबंधित व्हिडीओ :

International Media on India China Face Off on Galwan Valley

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ