AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा जवळचा मित्र संकटात, निम्मी लोकसंख्या हिंदू असलेल्या या देशात एअरपोर्ट बंद, लॉकडाऊनसारखी स्थिती

भारताचा जवळचा मित्र देश संकटात सापडला आहे. सावधानी म्हणून एअरपोर्ट बंद करण्यात आला. शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली. या देशात कोविड-19 च्या वेळी होती, तशी लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झाली आहे.

भारताचा जवळचा मित्र संकटात, निम्मी लोकसंख्या हिंदू असलेल्या या देशात एअरपोर्ट बंद, लॉकडाऊनसारखी स्थिती
garance cyclone
| Updated on: Feb 28, 2025 | 10:47 AM
Share

भारताचा जवळचा मित्र संकटात आहे. लवकरच या देशामध्ये मोठ चक्रीवादळ धडकणार आहे. या चक्रीवादळाबद्दल शुक्रवारीच हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. सध्या हे वादळ डेनिसपर्यंत पोहोचलय. हे वादळ 195 किलोमीटर प्रतितास वेगाने पुढे सरकतय. या चक्रीवादळाची माहिती बुधवारीच मिळाली. त्यामुळे खबरदारी म्हणून त्या दिवशीच एअरपोर्ट बंद करण्यात आला. शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्या देशात लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण झालीय. भारताचा हा जवळचा मित्र देश आहे मॉरीशस. या देशाची निम्मी लोकसंख्या हिंदू असून तिथे गारेंस नावाच एक मोठं चक्रीवादळ धडकणार आहे. सध्या हे वादळ सेंट डेनिसपर्यंत पोहोचल असून तिथून मॉरीशस 227 किलोमीटर अंतरावर आहे.

या वादळापासून मॉरीशसला धोका आहे. देश अलर्ट मोडवर असून सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांनाच आपल्या घरी राहण्याच अपील करण्यात आलं आहे. कोविड-19 च्या वेळी जसं सर्वांना घरी राहण्याच अपील करण्यात येत होतं, तसं आवाहन आता मॉरीशेसमध्ये केलं जातय. फक्त गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात येतेय. लॉकडाऊनसारखी स्थिती मॉरीशसमध्ये निर्माण झाली आहे.

सध्या वादळ किती किलोमीटरवर

बुधवारीच मॉरीशेसला हे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती मिळाली. सावधानी म्हणून एअरपोर्ट बंद करण्यात आला. शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली. गुरुवारी हे चक्रीवादळ जवळ आल्यानंतर रेड अलर्ट घोषित करण्यात आला. मॉरीशेसच्या हवामान विभागाने शुक्रवार सकाळपर्यंत हे चक्रीवादळ धडकेल असा अंदाज वर्तवला होता. शुक्रवारी सकाळी 4 वाजता हे चक्रीवादळ मॉरीशेसपासून 245 किलोमीटर अंतरावर होतं. सकाळी 9 च्या सुमारास ते 227 किलोमीटर अंतरावर आलं. फक्त मॉरीशेसच नाही फ्रान्सच्या ला रीयूनियन बेटावरचा एअरपोर्टही गुरुवारी बंद करण्यात आला.

किती धोकादायक आहे हे वादळ?

गारेंस चक्रीवादळाचा कॅटेगरी 3 चक्रीवादळात समावेश करण्यात आला आहे. कॅटेगिरी 3 मधील चक्रीवादळ Severe Tropical Cyclone मानलं जातं. या वादळाच्यावेळी 165-224 किलोमीटर प्रतीतास वेगाने वार वाहतं. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात घराच नुकसान होऊ शकतं. झाडं कोसळतात. वीज प्रवाह खंडीत होतो. मॉरीशेसच्या हवामान विभागाने हे तीव्र स्वरुपाच वादळ असल्याच म्हटलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.