दहशतवादाविरोधात रशिया आणि चीन खंबीरपणे भारतासोबत, सुषमा स्वराज यांचा चीन दौरा यशस्वी
मुंबई : पाकिस्तानमधील दहशतवाद संपवण्याच्या भारताच्या मोहिमेला चीन आणि रशियानेही पाठिंबा दिलाय. या दहशतवादी संघटना राजकीय फायद्यासाठी वापरलं जाणं पूर्णपणे चुकीचं असून त्याचा नायनाट करणं गरजेचं असल्याचं चीन आणि रशियाने स्पष्ट केलं. रशिया, चीन आणि भारत या तीन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या चीनमध्ये झालेल्या बैठकीत दहशतवादावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर तीनही देशाच्या मंत्र्यांनी दहशतवादाविरोधात दंड थोपटले. […]

मुंबई : पाकिस्तानमधील दहशतवाद संपवण्याच्या भारताच्या मोहिमेला चीन आणि रशियानेही पाठिंबा दिलाय. या दहशतवादी संघटना राजकीय फायद्यासाठी वापरलं जाणं पूर्णपणे चुकीचं असून त्याचा नायनाट करणं गरजेचं असल्याचं चीन आणि रशियाने स्पष्ट केलं. रशिया, चीन आणि भारत या तीन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या चीनमध्ये झालेल्या बैठकीत दहशतवादावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर तीनही देशाच्या मंत्र्यांनी दहशतवादाविरोधात दंड थोपटले.
पुलवामा हल्ल्यानंतर सुषमा स्वराज सातत्याने विविध देशांच्या संपर्कात आहेत. रशिया आणि चीनने पाकिस्तानचं नाव घेतलं नसलं तरी दहशतवादाचं मूळ जिथे आहे तिथून त्याचा नायनाट करण्याबाबत तीन देशांत एकमत झालंय.
“माझा चीन दौरा तेव्हा होतो आहे जेव्हा भारतात दु:ख आणि संताप आहे. काही दिवसांआधी जम्मू-काश्मीरमध्येही मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, हा हल्ला पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदने घडवून आणला होता. याचेच उत्तर भारताने दिले आहे”, भारताच्या एअर स्ट्राईकबाबत रोष व्यक्त करताना सुषमा स्वराज या चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसमोर आपल्या भावना मांडल्या. जेव्हा भारताने जैश विरोधात कुठलीही कारवाई केली नाही, त्यानंचतर भारताला हा निर्णय घ्यावा लागला, असेही सुषमा स्वराज म्हणाल्या.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लु कांग म्हणाले, “आम्हाला आशा आहे की भारत आणि पाकिस्तान दोन्ही संयम राखतील आणि चर्चेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने पाऊल उचलतील. दोन्ही देश दक्षिण आशियात शांतता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतील.”
मंगळवारी भारताच्या एअर स्ट्राईकनंतर सुषमा स्वराज यांनी लगेच याची माहिती रशिया आणि चीनला दिली. त्यानंतर आज त्यांनी रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चीनमध्ये बैठकही केली.
तर दुसरीकडे, भारताच्या एअर स्ट्राईकनंतर भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातोय. पण जगभरातील प्रमुख देश भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सनंतर अमेरिकेनेही भारताची बाजू घेत पाकिस्तानला ठणकावलंय. पाकिस्तानने त्यांच्याकडे पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाचा नायनाट करावा, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी म्हटलंय. पाकिस्तानने दहशतवाद संपवला तरच दोन्ही देशांमधील संबंध चांगले होऊ शकतील, असंही ते म्हणाले.
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी माईक पॉम्पियो यांनाही याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर पॉम्पियो यांनी भारताचं समर्थन केलं. यावर पॉम्पियो म्हणाले, “मी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरैशी यांच्याशी बातचीत केली. सध्या कोणत्याही प्रकारची सैन्य कारवाई टाळून तणाव कमी करण्याबाबत त्यांना सल्ला दिलाय. सोबतच पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवर वाढत असलेल्या दहशतवादी तळांवर कारवाई करावी”, असं सांगितल्याचं पॉम्पियो यांनी म्हटलंय.