
बर्लिनः रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) आज चाळीसावा दिवस आहे, या चाळीस दिवसात रशियन सैनिकांची (Russian Army) क्रुरता किती भयानक आहे ते आता साऱ्या जगासमोर आले आहे. युक्रेन (Ukraine) राजधानी असलेल्या कीव शहराजवळचे बूचा शहरावर रशियन सैन्यांनी आता ताबा मिळवला असून या शहरात 410 मृतदेह सापडले असल्याने युक्रेनमध्ये पुन्हा नरसंहारामुळे हाहाकार माजला आहे. त्यामुळे रशियन सैन्याच्या चेचन सैनिकांनी बुचामध्ये ‘नरसंहार’ केल्याचा आरोप युक्रेनने रशियावर केला आहे.
युक्रेनकडून दीर्घ कालाखंडानंतर युक्रेनियन सैन्यांकडून या भागाची पाहणी करण्यात आली तेव्हा, त्यांना जे समोर चित्र दिसेल ते भयानक होते, रस्त्यावर सर्वत्र मृतदेह पसरले होते. या मृतदेहांची पाहणी करण्यात आली तेव्हा त्यांचे हात बांधून त्यांनी गोळ्या घालण्यात आल्या होत्या. रशियाकडून हे आरोप फेटाळण्यात आले असले तरी या मृतदेहांची छायाचित्र हृदय पिळवटून टाकणारी आहे.
Ukraine accuses Russia of war crimes in Bucha, Moscow says incident was staged, calls UNSC meeting pic.twitter.com/TGpqIXV1C0
— RT (@RT_com) April 4, 2022
युक्रेनमधील बूचा शहरात इतके मृतदेह मिळत आहेत की, त्या मृतदेहांसाठी 45 फुटांचा खड्डा खोदावा लागत आहे. तर बूचा शहरात काही महिलांचे नग्न मृतदेह मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर क्रुरतेचा कळस गाठल्याचा आरोप करुन त्यांच्या बलात्कार करुन मारुन टाकल्याचा आरोप रशियावर करण्यात आला आहे. तर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या एका सहकाऱ्यांनी सांगितले की, युक्रेन सैन्यांना असे काही मृतदेह मिळाले आहेत की, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. जे मृतदेह मिळाले आहेत, त्या महिलांच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. ज्या महिलांचे मृतदेह मिळाले आहेत, त्यांचे हात पाठीमागून बांधले गेले आहेत, आणि त्यांना पाठीमागून गोळ्या मारण्यात आल्या आहेत. झेलेंस्कीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, युद्धकाळातील हा खूप मोठा गंभीर गुन्हा आहे.
या घटनेमुळे युरोपमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्का बसला असून या युद्धापराधमधील घटनेची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. युरोपियन युनियनचे परराष्ट्र खात्याचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी सांगितले आहे की, “रशियन सैन्याने केलेल्या क्रूरतेमुळे मला धक्का बसला आहे. युरोपियन युनियनकडून युक्रेनला युद्धात घडलेल्या गुन्ह्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशियावर खटला चालवण्याची शक्यता वर्तवण्यात आलीआहे.
रशियाने या घटनेमबद्दल साफ नकार दिला आहे, हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर त्यांनी सांगितले की, आम्ही कोणत्यीह नागरिकांची हत्या केली नाही. मात्र युक्रेनने हा सगळा क्रम सांगून त्यांना म्हटले आहे की, बुचामधून माघार घेताना रशियन सैन्यांकडून चारशेच्या वर माणसांची कत्तल करण्यात आली आहे. बूचा हे शहर कीवपासून 37 किलोमीटर आहे, या शहरावर रशियन सैन्यांकडून एक महिना ताबा घेण्यात आला होता.
बुचा शहरात अजूनही अनेक मृतदेहांचा खच पडला आहे, तर काही मृतदेहांवर चर्चमधील सामूहिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. युक्रेनच्या गृहमंत्र्यालयाकडूनही असंख्य नागरिकांची हत्या करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र गृहमंत्रालयाकडून आकडा जाहीर करण्यात आला नाही. तर युक्रेनचे उपसंरक्षण मंत्री हन्ना मालेर यांनी जाहीर केले आहे की, रशियन सैन्यांकडून कीव प्रदेश आता सैन्यामुक्त करण्यात आला आहे, इरपिन, बूचा, हॉस्टोमेल आणि इतर शहरांतून सैन्य माघार घेतले गेले असल्याचे सोशल मीडियाद्वारे पोस्ट करुन सांगण्यात आले आहे.
रशियाकडून हल्ल्या झाल्यानंतर इरपिनमध्ये दोनशे नागरिक मारले गेल्याचे सांगण्यात आले आहे. तर बीबीसीच्या अहवालानुसार या हिंसाचारात 70 हजार नागरिक इरपिनमधून पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे.सध्या बुचा शहराजवळील अनेक शहरांतून मृतदेहांचा खच पडला आहे, त्यांच्या सामुहिक अंत्यविधी करण्यात येत आहे, एका वेळी चारशे पेक्षा जास्त मृतदेह पुरले जात असल्याचे बुकाचे महापौर अनातोली फेडोरुक यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
धक्कादायक! पत्नीच्या हट्टासाठी आईला नदीत फेकलं, मानवतेला काळीमा फासणारी घटना
स्कूलबसमधून मुलं घरी वेळेत न आल्यानं पालक धास्तावले! सांताक्रूझमध्ये नेमकं काय घडलं?