Middle East War : तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ, अमेरिका, इस्रायल, इराण नाही तर एकच देश या युद्धात खरा विजेता तो म्हणजे..

Middle East War : अमेरिका, इस्रायल आणि इराण या तीन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. तिघांचही या युद्धात प्रचंड नुकसान होतय. अमेरिकेला या युद्धाची प्रत्यक्ष झळ बसत नसली तरी त्यांचा पैसा चाललाय. इस्रायलमध्ये जिवीतहानी कमी असली, तरी त्यांचं सुद्धा नुकसान झालय. इराणच तर कंबरड मोडून गेलय. पण या तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ होतोय.

Middle East War : तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ, अमेरिका, इस्रायल, इराण नाही तर एकच देश या युद्धात खरा विजेता तो म्हणजे..
War
| Updated on: Mar 12, 2026 | 11:46 AM

मागच्या महिन्याच्या 28 तारखेला अमेरिका-इस्रायलने एकत्र येत इराण विरुद्ध युद्ध सुरु केलं. अमेरिका-इस्रायलने हे युद्ध सुरु करण्यामागे दोन उद्दिष्टय होती. एक म्हणजे इराणमध्ये सत्ता बदल आणि दुसरं म्हणजे इराणने सर्वधन केलेलं युरोनियम नष्ट करणं. म्हणजे त्यांना अणू बॉम्ब बनवता येणार नाही. सध्या तरी अमेरिका आणि इस्रायल त्यांच्या या दोन्ही उद्दिष्ट्यांपासून बरीच लांब आहेत. कारण अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणमध्ये प्रचंड आर्थिक नुकसान झालय. जिवीतहानी सुद्धा झाली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांना इस्रायल-अमेरिकेने संपवलं. पण इराणमध्ये सत्ता बदल काही होत नाहीय. अमेरिका-इस्रायलला वाटलेलं की, इराणवर बॉम्बफेक केल्यानंतर तिथली जनता रस्त्यावर उतरेल.

पण असं घडत नाहीय. मुख्य म्हणजे या युद्धाच्या महिन्याभर आधी इराणमधील लोक रस्त्यावर उतरलेले. तिथल्या सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार आंदोलनं चाललेली. पण प्रत्यक्ष युद्ध सुरु झाल्यानंतर तिथली जनता रस्त्यावर उतरलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी वारंवार आवाहन करुनही काहीही फरक पडलेला नाही. इस्रायलने तर इराणी टीव्ही चॅनल हॅक करुन नेतन्याहू यांचा संदेश प्रसारीत केला. पण त्यानंतरही तिथली जनता रस्त्यावर उतरलेली नाही. याचा अर्थ इतकाच होतो की, इराणमध्ये अजून IRGC ची पकड कायम आहे. इस्रायल-अमेरिकेला जे हवय ते इतक्यात तरी घडणार नाहीय. त्यासाठी त्यांना दीर्घकाळ लढावं लागेल. वेगवेगळ्या रणनितीचा अवलंब करावा लागेल.

इराणचं हे रणनितीक यश आहे

इराणचं या युद्धाने आर्थिक कंबरडं मोडून काढलं आहे. मात्र, तरीही ते लढतायत. अमेरिका-इस्रायलवर दबाव आणण्यासाठी त्यांनी आखाती देशातील तेल रिफायनरीजना लक्ष्य केलय. स्ट्रेट ऑफ होर्मुझचा मार्ग बंद करुन टाकलाय. जिथून जगातली 20 टक्के तेल वाहतूक होते. त्यामुळे युद्ध संपवण्यासाठी अमेरिका-इस्रायलवर दबाव वाढला आहे. इराणचं हे रणनितीक यश आहे. या सगळ्या खेळात फायदा जो आहे तो एकाच देशाला होतोय, तो म्हणजे रशिया.

भारताचं बहुतांश तेल, गॅस याच मार्गावरुन येतो

कारण या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा बाधित झाला आहे. भारताचं बहुतांश तेल, गॅस याच मार्गावरुन येतो. म्हणूनच अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदीची 30 दिवसांसाठी परवानगी दिली आहे. भारताने रशियाकडून 30 मिलियन बॅरल तेल विकत घेतलं आहे. म्हणजे 3 कोटी बॅरल तेलाची खरेदी केली आहे. महत्वाचं म्हणजे जे रशिया आधी भारतात स्वतात तेल देत होतं. ते आता चढ्या भावाने विकत आहे. आता भारताच्या तेल रिफायनरीजमध्ये हे तेल प्रोसेस होऊन जगातील अन्य देशांपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं. यात रशियाचा आर्थिक फायदा होत आहे.

 

 

 

Follow Us