धाड धाड…रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, ड्रोन, मिसाईल डागल्याने हाहाकार!
रशियाने नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला आहे. रशियाने युक्रेनवर अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागले आहेत. त्यामुळे युक्रेनच्या अनेक भागांचे नुकसान झाले आहे.

Russia And Ukraine War : गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या प्रमुखांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. परंतु अजूनही तोडगा काढण्यात ट्रम्प यांना यश आलेले नाही. हे दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ला करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आता नव्या वर्षात रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला केला आहे. रशियाकडून रात्रभर युक्रेनवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागण्यात आले आहेत. या हल्ल्यामुळे रशियातील अनेक इमातींचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर आता रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून हे युद्ध थांबवण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्याचेही हा हल्ला द्योतक असल्याचे बोलले जात आहे.
293 ड्रोन आणि 18 क्षेपणास्त्र डागली
मिळालेल्या माहितीनुसार रशियान युक्रेनवर मोठे हल्ले केले आहेत. या हल्ल्यात रशियाने एकूण 293 ड्रोन आणि 18 क्षेपणास्त्रे डागली आहेत. 12 जानेवारीची रात्र आणि 13 जानेवारीची सकाळ यादरम्यान रशियाने हा हल्ला केला आहे. आपल्या हल्ल्यात रशियाने युक्रेनच्या वेगवेगळ्या भागांना लक्ष्य केले. हल्ल्यानंतर युक्रेनच्या अनेक भांगात वीज नव्हती. सध्या युक्रेनमध्ये कडाक्याची थंडी आहे. अशा स्थितीत वीज नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. 2026 या नव्या सलाताली रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे.
बरेच ड्रोन केले नष्ट
या हल्ल्यानंतर युक्रेनच्या वायू सेनेने निवेदनाच्या माध्यमातून हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यातील 293 ड्रोनपैकी 240 ड्रोन नष्ट करण्यात आले. तसेच 18 क्षेपणास्त्रांपैकी 7 क्षेपणास्त्रदेखील यशस्वीपणे निष्ट करण्यात आले. या हल्ल्यांमुळे युक्रेनधील काही भागाचाे नुकसान झाले. परंतु वायुसेना, मोबाईल फायटर ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक वारफेअर ग्रुपने एकत्र कारवाई करून हे हल्ले बऱ्यापैकी अयशस्वी केले, असे युक्रेनीयन सैन्याने सांगितले आहे. दरम्यान, आता रशियाच्या या हल्ल्याला युक्रेन नेमकं कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
