
रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी अमेरिका ही भारतावर दबाव टाकत आहे. हेच नाही तर रशियाकडून तेल खरेदी करणे भारताने तात्काळ बंद करावे, याकरिता तब्बल 50 टक्के टॅरिफ हा लावण्यात आला आहे. मात्र, भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवले असून अमेरिकेसोबतची चर्चा देखील बंद केलीये. अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावल्यामुळे भारतावर त्याचा काही क्षेत्रांमध्ये थेट परिणाम झालाय. मात्र, रशियाने भारतासाठी त्यांची बाजारपेठेत पूर्ण खुली केलीये. भारत हा इतर देशांसोबत महत्वाचे करार करत आहे. आता रशियाने अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर थेट मोठे गिफ्ट दिले आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, रशियन अधिकारी दिमित्री शुगायेव यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, भारताकडे आधीच आमची S400 प्रणाली आहे. या क्षेत्रातही आमचे दोन्ही देशांचे परस्पर सहकार्य वाढवण्याच्या शक्यता आहेत. सध्या, आम्ही चर्चा करत आहोत. भारताने 2018 मध्ये 5.5 अब्ज डॉलर्सच्या 5 एस 400 क्षेपणास्त्र प्रणालींसाठी करार केला होता. रशियाने भारताला आतापर्यंत S400 तीन क्षेपणास्त्र दिली आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर रशिया सर्वपद्धतीने भारताला मदत करत आहेत. S400 क्षेपणास्त्र रशियाला भारताल देणार आहे.
फक्त हेच नाही तर अमेरिकेचा जळफळाट हाच आहे की, भारत हा रशियाकडून स्वस्तामध्ये तेल खरेदी करतोय आणि त्यावर रिफायनरी करून जगभरात विकून पैसा कमावत आहे. रशियाने अमेरिकेला धक्का देत थेट भारतासाठी कच्च्या तेलाच्या किंमती या कमी केल्या आहेत. हा मोठा धक्काच अमेरिकेला म्हणावा लागेल. त्यामध्येच आता परत एकदा S400 क्षेपणास्त्र हे रशिया भारताला देणार आहे. या क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्ला भारताने जोरदार प्रतिउत्तर पहलगाम हल्ल्यानंतर दिले होते.
हवेमध्येच पाकिस्तानचे बॉम्ब या क्षेपणास्त्राने फोडली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर रशियाने हा अमेरिकेला दिलेला मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे. रशिया प्रत्येक वेळी भारताच्यासोबत असल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. हेच नाही तर चीनच्या दाैऱ्यावर पुतिन आणि नरेंद्र मोदी हे असताना दोन्ही नेते एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले. याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली.