डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भीक न घालता रशियाचा मोठा धक्का, भेटीपूर्वीच…

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 15 ऑगस्टला बैठक आहे. त्यापूर्वी रशियाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वादग्रस्त विधान करण्यात आले. मात्र, आता रशियाकडून जोरदार उत्तर दिले जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भीक न घालता रशियाचा मोठा धक्का, भेटीपूर्वीच...
Donald Trump and Vladimir Putin
| Updated on: Aug 13, 2025 | 10:25 AM

भारत अमेरिकेकडून कच्चे तेल स्वस्तामध्ये खरेदी करत असल्याने अमेरिकेची पोटदुखी सुरू आहे. हेच नाही तर अमेरिकेकडून भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्यात आलाय. यादरम्यान अनेक मोठ्या घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळतंय. 15 ऑगस्टला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात रशिया-युक्रेन शांतता चर्चा होणार आहे. पुतिन हे अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाबद्दल मोठे विधान करत त्यांच्या अर्थव्यवस्थेबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी म्हटले की, भारतावर टॅरिफ लावल्यानंतर रशियाला धक्का बसला असून त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार.

आता रशियाने देखील मोठे पाऊल उचलले आहे.  बैठकीपूर्वीच दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव वाढला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ट्रम्प यांनी पुतिन यांनीच स्वतः ही बैठक बोलावल्याचा दावा केलाय. सतत ते रशियाच्या विरोधात भाष्य करत आहेत. आता अमेरिकेला रशियाकडून वेगळ्याप्रकारे उत्तर देण्यात आलंय. रशियाने आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. जगातील सर्वात धोकादायक क्षेपणास्त्रांपैकी एक असलेल्या 9M730 बुरेव्हेस्टनिकच्या संभाव्य चाचणीची तयारी केलीये.

हे जगातील सर्वात वादग्रस्त क्षेपणास्त्र आहे. 9M730 बुरेव्हेस्टनिक हे रशियाचे मोठे शस्त्र आहे. हे अणुऊर्जेवर चालणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ते अण्वस्त्रे वाहून नेण्यास महत्वाचे आहे. याची सर्वात मोठी शक्ती म्हणजे जगाच्या कोणत्याही भागात हे हल्ला करू शकते, त्यामध्ये तेवढी शक्ती आहे. या क्षेपणास्त्रला रोखणे कठीण आहे. यूएस NASIC च्या अहवालानुसार, जर हे क्षेपणास्त्र सक्रिय झाले तर रशियाला एक धोरणात्मक फायदा मिळू शकतो.

रशियाने 7 ते 12 ऑगस्ट दरम्यान 40,000 चौरस किलोमीटरच्या परिसरात NOTAM जारी केले आहे, जे सहसा मोठ्या क्षेपणास्त्र चाचणीपूर्वी केले जाते. रशियाने पंकोवो चाचणी श्रेणीजवळून चार रशियन जहाजे हटवली आहेत आणि त्यांना पूर्व बॅरेंट्स समुद्रातील लक्ष ठेवणाऱ्या चौक्यांवर तैनात केले आहे. अमेरिकेला एकप्रकारचा मोठा इशारा हा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. 9M730 बुरेव्हेस्टनिकची चाचणी रशिया करणार आहे आणि याच्या माध्यमातून थेट इशारा अमेरिकेला दिलाय.  भारतावर अमेरिकेने टॅरिफ लावल्यानंतर रशिया देखील चिंतेत आहे. जर 9M730 बुरेव्हेस्टनिकची यशस्वी चाचणी झाली, तर रशिया हा अणुऊर्जेवर चालणारे क्रूझ क्षेपणास्त्र असलेला जगातील पहिला देश असणार आहे.