झेलेन्स्की यांना भेटण्यास पुतिन यांचा होकार, पण….! रशियाचे राष्ट्राध्यक्ष शेवटी म्हणून गेले असं काही

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर त्याचे परिणाम होताना दिसत आहेत. या युद्धाचा फटका भारताला देखील बसला आहे. अमेरिकेने भारतावर रशियाला अप्रत्यक्षरित्या मदत करत असल्याचा आरोप केला आहे. असं असताना एक मोठी घडामोड समोर आली आहे.

झेलेन्स्की यांना भेटण्यास पुतिन यांचा होकार, पण....! रशियाचे राष्ट्राध्यक्ष शेवटी म्हणून गेले असं काही
झेलेन्स्की यांना भेटण्यास पुतिन यांचा होकार, पण....! रशियाचे राष्ट्राध्यक्ष शेवटी म्हणून गेले असं काही
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 03, 2025 | 9:11 PM

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला तीन वर्षाहून अधिकचा काळ लोटला आहे. मात्र युद्धस्थिती जैसे थेच आहे. असं असताना अमेरिकेने या युद्धाचा फायदा आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा वेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. युक्रेन युद्धात रशियाचा हेतू प्रादेशिक विस्तार नाही तर ‘लोकांच्या हक्कांचे’ रक्षण करणे आहे, असं व्लादीमीर पुतिन यांनी सांगितलं आहे. तसेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना भेटू, असं सांगितलं आहे. पण त्यांना भेटण्यात काही अर्थ आहे का? असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला. झेलेन्स्की यांना शांततेसाठी भेटायचं असेल तर त्यांना मॉस्कोला यावे, असं पुतिन म्हणाले. प्रत्येक देशाला स्वत:ची सुरक्षा हमी निवडण्याचा अधिकार आहे, यात युक्रेनही येतं. पण हे तत्व रशियाच्या सुरक्षेलाही लागू होतं हे देखील सांगण्यास विसरले नाहीत.

‘आम्ही युक्रेनच्या नाटोमध्ये सहभाग घेण्याचा विरोध करतो.’, असंही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी सांगितलं. यामुळे पूर्वेकडे होणारा विस्तार रशियन हितसंबंधांना धोका निर्माण करेल, अशी भीतीही व्यक्त केली. प्रत्येक समस्या संवादाने सोडवता येते. रशियालाही शांततापूर्ण तोडगा हवा आहे. पण शांततेत हे प्रकरण सुटलं नाही तर ते युद्धाद्वारे सोडवलं जाईल, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. दुसरीकडे, पुतिन यांनी युक्रेन युद्धासाठी पाश्चात्य देशांना जबाबदार धरलं. युक्रेनला शस्त्र आणि आर्थिक मदत देत आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली इत्यादी देश वारंवार युक्रेनसाठी सुरक्षा हमीचा आग्रह धरत आहेत.

युक्रेनसोबतची चर्चा जर पुढे न्यायची असेल तर सर्वप्रथम त्यांना मार्शल लॉ संपवावा लागेल, निवडणुका घ्याव्या लागतील आणि प्रादेशिक मुद्द्यांवर जनमत चाचणी घ्यावी लागेल, अशा अटी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी ठेवल्या आहेत. दोन्ही देशातील युद्ध तिसऱ्या वर्षात प्रवेश करत असताना चर्चेचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. दोन्ही बाजूंनी आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न केले ​​आहेत. असा स्थितीत दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि चर्चा यशस्वी झाली तर युक्रेन आणि रशियामधील दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाला पूर्णविराम लागू शकतो.