
रशिया युक्रेन युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. अमेरिका सातत्याने हे युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करत असून शांतता प्रस्तावही देण्यात आला. काही दिवसांपूर्वीच युक्रेनने थेट रशियाच्या जनरलला टार्गेट करत हल्ला केला. आता त्यांनी थेट युद्ध भूमीवर न लढता रशियाच्या मोठ्या नेत्यांना टार्गेट करून हत्या करण्याची योजना आखली आहे. युक्रेनने केलेल्या एका कृत्यामुळे रशिया युक्रेन युद्ध थांबण्यापेक्षा अधिक भडकण्याची दाट शक्यता आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर एका मोठ्या ड्रोन हल्ल्याद्वारे निशाणा साधण्यात आला आहे. व्लादिमीर पुतिन यांची झोपेतच हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. झोपेतच त्यांच्यावर ड्रोन हल्लाही केला जाणार होता. 28-29 डिसेंबर 2o25 च्या रात्री नोव्हगोरोदमधील पुतिन यांच्या निवासस्थानावर 91 ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. थेट पुतिन यांच्यावरच हल्ला करण्यात आल्याने रशियात मोठी खळबळ उडाली.
युक्रेनने पुतिन यांच्यावर केलेला हल्ला अपयशी ठरला. पुतिन यांच्यावर करण्यात आलेला हल्ला रशियाने उधळून लावला. मात्र, युक्रेनच्या या कृत्यामुळे हे युद्ध अधिकच भडकण्याची दाट शक्यता आहे. रशिया या हल्ल्याचा 100 टक्के आणि अत्यंत घातक बदला घेणार हे नक्की आहे. 91 ड्रोन पुतिन यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या घराजवळ पोहोचले आणि रशियाने हा हल्ला उधळून लावला. त्यानंतर लगेचच रशियाच्या लष्कराने महत्वाची बैठक घेतली.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की रशियाच्या प्रतिहल्ल्यातून वाचतील का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. युक्रेनने शांतता चर्चेदरम्यान रशियाच्या थेट अध्यक्षावर हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामुळे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ही घटना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. कारण रशिया आता कोणत्याही परिस्थितीमध्ये युक्रेनला नक्कीच हलक्यात घेणार नाही, हे नक्की आहे.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी सांगितले की, युक्रेनने लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे उत्तर रशियामधील अध्यक्षांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पुतिन यांना अत्यंत कडक सुरक्षा असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये पुतिन यांचे लोकेशन कळू दिले जात नाही. मात्र, युक्रेनच्या या हल्ल्यामुळे जग तणावात असून हे युद्ध अधिक भडकण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.