AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine War: अखेर युक्रेनसोबत युद्धविराम करण्यास रशिया तयार, ठेवली एक अट, पुतीन यांनी मोदींना म्हटले…

Russia Ukraine War: युक्रेनशी शत्रुत्व थांबवण्यासाठी आम्ही युद्धविरामाच्या प्रस्तावाशी सहमत आहोत. परंतु आम्ही या वस्तुस्थितीपासून पुढे जात युद्धविरामाचे रुपांतर कायम स्वरुपी शांतता निर्माण करण्यात झाले पाहिजे.

Russia Ukraine War: अखेर युक्रेनसोबत युद्धविराम करण्यास रशिया तयार, ठेवली एक अट, पुतीन यांनी मोदींना म्हटले...
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 14, 2025 | 2:10 PM
Share

Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनसोबत अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या युद्धाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुतीन यांनी युद्धविरामाची तयारी दर्शवली आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष थांबावा यासाठी प्रयत्न करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लूला दा सिल्वा यांच्यासह जगभरातील नेत्यांचे आभार मानले आहे. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्जेंडर लुकाशेंको यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत पुतिन म्हणाले, आम्ही युद्ध थांबवण्याचा प्रस्तावाचे समर्थन करत आहोत. परंतु आमचा आणखी एक विचार आहे. दोन्ही देशांमधील प्रश्नाचा कायमस्वरुपी तोडगा काढून युद्धबंदी केली जावी. संकटाचे मूळ कारणच शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे, असे पुतिन यांनी म्हटले आहे.

मोदींसह जगभरातील नेत्यांचे आभार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले की, यूक्रेनच्या निर्णयावर इतके लक्ष ठेवणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच बाझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांचे आभार व्यक्त करतो. कारण त्यांचा उद्देश एक मोठ्या मिशनीची प्राप्ती आहे. ज्यामुळे संपत्तीचे होणारे नुकसान आणि जीवीत हानी टाळता येईल.

कायमस्वरुपी शांतता हवी

पुतीन म्हणाले, युक्रेनशी शत्रुत्व थांबवण्यासाठी आम्ही युद्धविरामाच्या प्रस्तावाशी सहमत आहोत. परंतु आम्ही या वस्तुस्थितीपासून पुढे जात युद्धविरामाचे रुपांतर कायम स्वरुपी शांतता निर्माण करण्यात झाले पाहिजे. त्यासाठी या संकटाची मूळ कारणे शोधली पाहिजे. ट्रम्प यांनी ३० दिवसांचा युद्धविरामाचा प्रस्ताव आणला होता.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी असे काही म्हटले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युद्ध थांबवायचे नाही. परंतु ते थेट डोनाल्ड ट्रम्प यांना सांगण्यास घाबरतात. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतीन यांच्या प्रस्तावित युद्धबंदीबाबतच्या अस्पष्ट भूमिकेवरही टीका केली. झेलेन्स्की यांनी पुतिनच्या यूएस-प्रस्तावित 30 दिवसांच्या युद्धविरामावर नाराजी व्यक्त केली. पुतिन यांनी युद्धबंदीचे समर्थन तर केलेच पण चिंताही व्यक्त केल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण