युक्रेनच्या रेल्वे स्थानकावर रशियाचा ड्रोन हल्ला, ३० हून अधिक जण ठार, झेलेन्स्की म्हणाले हा तर क्रूर दहशतवाद

युक्रेनच्या शोस्तका रेल्वे स्थानकावर रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान 30 जण ठार झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्ल्याला "क्रूर दहशतवाद" असे म्हटले असून रशियाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.

युक्रेनच्या रेल्वे स्थानकावर रशियाचा ड्रोन हल्ला, ३० हून अधिक जण ठार, झेलेन्स्की म्हणाले हा तर क्रूर दहशतवाद
Russian drone strike
| Updated on: Oct 04, 2025 | 11:01 PM

Ukraine Train Drone Attack: युक्रेन आणि रशियातील युद्ध थांबतच नाहीए…ताज्या घडामोडीत युक्रेनच्या उत्तरेतील सुमी क्षेत्रातील शोस्तका रेल्वे स्थानकावर रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान ३० जणांचा मृ्त्यू झाला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याला क्रूर हल्ला असे म्हणत त्याला दहशतवादाच्या श्रेणीचा हा हल्ला असल्याचे ठरवले आहे. हल्ल्यावेळी रेल्वे स्थानकावर उक्रजालिज्नित्सिया (Ukrzaliznytsia) चे कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते. झेलेन्स्की यांनी त्यांच्या एक्स ( आधीचे ट्वीटर ) खात्यावर एक व्हिडीओ शेअर करीत हल्ल्यात ट्रेनची झालेली स्थिती दर्शवली आहे.

हल्ल्याचे फोटो आणि बचाव कार्य

प्रादेशिक गव्हर्नर ओलेह ह्रिगोरोव यांनी म्हटले की हा हल्ला शोस्तकाहून किव्हला जाणाऱ्या ट्रेनला लक्ष्य करुन करण्यात आला. ह्रिगोरोव यांनी आग लागलेल्या ट्रेनच्या कोचचे फोटो शेअर केले आणि सांगितले की आपात्कालिन आणि बचाव पथके घटनास्थळी पोहचल्या असून जखमींचा शोध घेतला जात आहे.

झेलेन्स्कीने केला विरोध

रशियासोबतची शांततेची बोलणी फिस्कटल्याने निराश झालेल्या झेलेन्स्की यांनी मॉस्को विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. दिखाऊ इशारे पुरेसे नाहीत. ते म्हणाले की रशियाला माहिती होते की ते नागरिकांना लक्ष्य करत आहेत. हा आंतकवाद आहे, ज्याकडे जग दुर्लक्ष करु शकत नाही.केवल ताकदीनेच त्यास थांबवता येऊ शकते. युरोप आणि अमेरिकेचे कठोर शाब्दीक इशारे आता वास्तवात बदलण्याची वेळ आली आहे.

यूरोपीय संघाचे वक्तव्य

यूरोपीय आयोगाच्या प्रेसीडेन्ट उर्सुला वॉन डेर लेयेने यांनी या हल्ल्याचा निषेध करताना म्हटले की, EU यूक्रेन सोबत उभा आहे.शोस्तका रेल्वे स्थानकाची घटना रशियाचा क्रुरता दर्शवत आहेत. जगाला रशियावर दबाव टाकायला हवा.जोपर्यंत तो न्यायसंगत आणि स्थायी शांततेचा स्वीकार करत नाहीत.

येथे पाहा पोस्ट –

रशिया-यूक्रेन युद्धाची ताजी स्थिती

गेल्या दोन महिन्यांपासून रशिया युक्रेनच्या रेल्वे आणि पायाभूत सुविधांवर जवळपास दररोज हल्ले करत आहे. एक दिवसांपूर्वीच रशियाने खारकीव्ह आणि पोल्टावा क्षेत्रात Naftogaz गॅस आणि तेलाच्या सुविधांना लक्ष्य केले. ज्यामुळे ८ हजाराहून अधिक लोकांची वीज गेली. युक्रेनचे सैन्यानेही रशियाच्या तेल आणि गॅस रिफायनरीवर हल्ल्यांचा वेग वाढवला आहे. सप्टेंबरमध्ये त्यांनी रशिया आणि रशियन नियंत्रण असलेल्या क्षेत्रात १९ तेल सुविधांवर हवाई आणि ड्रोन हल्ले केले होते.

यूक्रेनची प्रतिक्रिया

रशियाने अलिकडेच शांततेची बोलणी थांबवली आणि युरोपिय देशांवर यावर बाधा आणण्याचा आरोप केला. झेलेन्स्कींनी अमेरिका आणि युरोपिय सहकाऱ्याशी रशिया विरोधात आर्थिक निर्बंध लावणे आणि थेट बोलणी करण्याचे आवाहन केले आहे.