व्लादिमीर पुतिन यांचा मोठा खुलासा, थेट म्हणाले, या गोष्टीचा सर्वात मोठा धोका, भारतात येताच…

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दाैऱ्यावर असून यादरम्यान काही महत्वपूर्ण करार होणार आहेत. संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर आहेत. पुतिन यांच्या या दाैऱ्याचा धसका अमेरिकेने घेतला असून पुतिन यांनी नाटो देशांबद्दल मोठे विधान केले.

व्लादिमीर पुतिन यांचा मोठा खुलासा, थेट म्हणाले, या गोष्टीचा सर्वात मोठा धोका, भारतात येताच...
Vladimir Putin
Updated on: Dec 05, 2025 | 9:02 AM

रशियाचे अध्यक्ष पुतिन भारत दाैऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी स्वत: विमानतळावर पुतिन यांच्या स्वागतासाठी पोहोचले. युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान पहिल्यांदाच पुतिन भारत दाैऱ्यावर आले आहेत. भारत आणि रशियातील संबंध अनेक वर्षांपासून मजबूत आहेत. 2021 नंतर आता पुतिन पुन्हा भारत दाैऱ्यावर आहेत. भारतावर अमेरिकेचा प्रचंड दबाव रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी आहे. भारत आणि रशियात अनेक महत्वाचे करार होण्याचे संकेत आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नाटो देशांबद्दल मोठे विधान केले. पुतिन यांनी म्हटले की, नाटो देश रशियासाठी मोठा धोका आहेत. नाटो रशियाच्या सुरक्षेला कमकुवत करत आहेत आणि रशियाविरुद्ध ते कट रचत आहेत. नाटो देश युक्रेनला युद्धासाठी मदत करत असल्याचेही पुतिन यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते.

पुतिन यांनी म्हटले की, युक्रेनने तटस्थ भूमिका घेतली पाहिजे. पुतिन यांनी म्हटले, रशियाने कायमच आपल्या हिताचे रक्षण केले आहे. यावरून पुतिन यांनी इशारा दिला की, रशियाच्या अटी मान्य केल्याशिवाय युक्रेनमध्ये शांतता परत येणार नाही. युकेनने नाटो देशातून बाहेर पडावे, अशी प्रमुख अट रशियाची आहे. मात्र, हे युक्रेनला मान्य नाहीये. रशिया फक्त युक्रेनसोबतच नाही तर संपूर्ण नाटो देशांसोबत युद्ध लढत असल्याने पुतिन यांनी म्हटले होते.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत पुतिन यांनी म्हटले की, नाटो देश युरोप आणि रशियाला धोका निर्माण करत आहेत. ते रशियाच्या सुरक्षेवर धोका पोहोचवत आहेत. मुळात म्हणजे रशियाने युद्ध सुरू केले नाही आणि युक्रेनला संघर्षात ढकलल्याबद्दल पाश्चात्य देशांचा दोष आहे. डोन्बासमध्ये रशियन नागरिकांचा छळ केला जात आहे.

रशियाच्या कीवशी असलेल्या संबंधांवर भर दिला आणि रशिया डोन्बास पूर्णपणे मुक्त करेल असे सांगितले. व्लादिमीर पुतिन यांनी ब्रिटन आणि जर्मनीच्या अर्थव्यवस्थांवर टीका केली. बहुतेक युरोप मंदीचा सामना करत आहे आणि G7 च्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. रशियाकडून व्यापार न करण्यासाठी अनेक देशांवर अमेरिकेचा दबाव आहे. आता पुतिन यांनी नाटो देशांवर गंभीर आरोप केला आहे.