AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना कॅमेऱ्याची भीती! खामेनेई यांच्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर उचललं असं पाऊल

जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असून कधी काय घडेल सांगता येत नाही. संपूर्ण जगाला युद्धाचा झळा सोसाव्या लागत आहेत. देशाच्या प्रमुखांची हत्या घडण्याची शक्यता देखील आहे. अशा स्थितीत रशियाने राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलली आहे. एआयचा धोका ओळखून पुतिन यांच्यावर देखरेख ठेवणारे कॅमेरे तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.

रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना कॅमेऱ्याची भीती! खामेनेई यांच्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर उचललं असं पाऊल
रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना कॅमेऱ्याची भीती! खामेनेई यांच्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर उचललं असं पाऊलImage Credit source: Getty Images
| Updated on: Jun 09, 2026 | 6:29 PM
Share

अमेरिका इस्त्राईल- इराण आणि रशिया युक्रेन युद्धाचा झळा संपूर्ण जगाला सोसाव्या लागत आहे. या युद्धाचा थेट असा निष्कर्ष निघालेला नाही. पण काही घडामोडी या चिंतेत भर टाकणाऱ्या आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इस्रायलने एआय प्रणालीचा वापर करून इराणी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यातून खामानेईंच्या हालचालींचा मागोवा घेणे शक्य झाले. रशियाने यातून धडा घेत राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांची सुरक्षा वाढवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 8 जून रोजी रशियन सुरक्षा संस्था असलेल्या एफएसबीने पुतीन आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर पाळत ठेवणाऱ्या एका विशेष कॅमेरा नेटवर्कचा काही भाग तात्पुरता बंद केला आहे. एआय आणि अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने शत्रू देश किंवा हॅकर्स या कॅमेऱ्याचा एक्सेस मिळवू शकतात. तसेच पुतिन यांच्या हालचालीवर देखरेख ठेवू शकतात. त्यामुळे त्यांची माहिती मिळू नये यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे.

एआय काय करू शकते?

मॉस्कोमध्ये जवळपास 3 लाख कॅमेरे आहेत. पण त्यापैकी पुतिन यांच्या सुरक्षेसाठी असलेली कॅमेरा प्रणाली चाचणीसाठी बंद करण्यात आली आहे. अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान पाहता हा निर्णय घेतला आहे. एआय तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की लाखो तासांचं व्हिडीओ फुटेज वेगाने तपासू शकते. फक्त काही प्रश्न विचारून हे शक्य असल्याचं बोललं जात आहे. फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार, एखाद्या शत्रूने ही प्रणाली हॅक केली तर सहज पुतिन यांच्या दैनंदिन जीवनाची माहिती मिळवू शकते. ही भीती रशियन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. इतकंच सुरक्षेच्या पद्धतीही उघडकीस येऊ शकतात. त्यामुळे पुतिन यांनी कॅमेरा नेटवर्कच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.

सुरक्षा क्षेत्रात एआयची भीती का?

एका अहवालात नोव्हेंबर 2025 मध्ये सायबर हेरगिरी झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात काय घडू शकते याचा अंदाज बांधला जात आहे. एआय कंपनी अँथ्रोपिकच्या मते, चीनच्या संबंधित एका सायबर गटाने तंत्रज्ञान, वित्त, रासायनिक उद्योग आणि सरकारी संस्थांसह सुमारे 30 संस्थांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे सायबर हेरगिरी आणि हॅकिंगसाठी एआय आता एक शक्तिशाली शस्त्र बनले आहे. तज्ज्ञांच्या मते, आधुनिक एआय आता कॅमेरे फक्त रेकॉर्डिंग पुरता मर्यादित ठेवत नाही. त्याचं डेटा स्रोतामध्ये रुपांतरित करण्याची ताकद ठेवते. त्यामुळे जगभरातील देशांना आता देखरेखीसाठी असलेल्या प्रणालीबाबत अधिक चिंता सतावत आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर