AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला ज्याची प्रचंड भीती तेच घडले, रशिया पाकिस्तान यांच्यात थेट करार, दोन्ही..

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अनेक वर्षांपासूनचे आहेत. भारताच्या मदतीला कायमच रशिया धावून आला. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करतो. यादरम्यानच भारतासाठी धक्कादायक माहिती पुढे येतंय.

भारताला ज्याची प्रचंड भीती तेच घडले, रशिया पाकिस्तान यांच्यात थेट करार, दोन्ही..
Russia deal with Pakistan
| Updated on: Jun 09, 2026 | 3:18 PM
Share

भारत आणि रशिया यांच्यात खास मैत्री आहे. अनेक वर्षांची आहे. भारताला ज्या ज्यावेळी रशियाची मदत लागली, त्यावेळी रशिया कायमच भारताच्या मदतीला आला. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतरही भारताच्या मागे खंबीरपणे रशिया उभा होता. भारताने रशियाला मदत केली. भारत रशियाकडून तेल खरेदी करणारा जगातील दुसरा नंबरचा देश आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दाैऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी भारतासोबत मोठे करार केले. हेच नाही तर पुतिन आणि नरेंद्र मोदी एकत्रच चीनच्या दाैऱ्यावर गेले होते. पाकिस्तानला सुरूवातीपासूनच भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री अजिबातच पटत नाही. त्यामध्येच गेल्या काही दिवसांपासून रशियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सतत पाकिस्तान करत आहे. शेवटी पाकिस्तानच्या प्रयत्नांना यश आले. थेट मोठा करार रशिया आणि पाकिस्तानमध्ये झाला. हा भारताला मोठा धक्का म्हणावे लागेल.

रशियासोबत पाकिस्तानने एका मोठ्या करारावर स्वाक्षरी केली. किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या गृहमंत्र्यांच्या बैठकीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने म्हटले की, अवैध स्थलांतर आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करणार आहे. याबाबत सहमती झाली. पाकिस्तान आणि रशियात करार झाला.

गृहमंत्री मोहसिन नक्वी बिश्केक येथे दाखल झाले, तर रशियन बाजूने व्लादिमीर कोलोकोल्त्सेव उपस्थित होते. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांमध्ये अवैध नागरिकांचे प्रत्यावर्तन, घुसखोरीला आळा घालणे आणि अमली पदार्थांच्या तस्करीवर कारवाई करणे यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी बिश्केक यावेळी उपस्थित होते. रशियाकडून व्लादिमीर कोलोकोल्त्सेव उपस्थित होते.

घुसखोरीला आळा घालणे, अंमली पदार्थाची तस्करी अशा गोष्टींचा यात समावेश आहे. रशियासोबत मैत्री करण्याकरिता पाकिस्तान सतत धडपड करत आहे. मात्र, रशिया यापूर्वी दाद देत नव्हता. शेवटी आता रशियाने पाकिस्तानला दाद दिली आणि त्यांच्यासोबत करार केला. मात्र, रशिया आणि पाकिस्तान यांची मैत्री भारताकरिता डोकेदुखी ठरू शकते. अगोदरच भारताविरोधात अमेरिकेला पाकिस्तान भडकवतो.

Follow Us
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...