AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतच सर्वात मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू

रशियाने केलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला मानला जात आहे युक्रेनची वायूसेनेने 266 ड्रोन आणि 45 क्षेपणास्र निकामी केली आहेत. तरीही अनेक अपार्टमेंट आणि पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतच सर्वात मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
| Updated on: May 25, 2025 | 4:11 PM
Share

रशियाने काल रात्री युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. यात 367 ड्रोन आणि मिसाईल विविध शहरावर डागली. या भीषण हल्ल्यात 13 लोकांचे जीव गेले आहेत. जायटॉमिरमध्ये तीन मुलांचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात डझनावरील लोक ठार झाले आहेत. हल्ल्याच्या रोख किव, खारकीव, मायकोलाईव्ह, टर्नोपिल आणि खमेलनित्सकी सारखी शहर आली आहेत.

झेलेन्स्की अमेरिकेवर संतापले

या हल्ल्यात खमेलनित्स्कीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे तर  राजधानी किवमध्ये ११ जण जखमी झाले,  शुक्रवारी झालेल्या आणखी एका मोठ्या ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर लागोपाठचा हा दुसरा हल्ला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या कमजोर रिएक्शनवर जोरदार  टीका केली आहे आणि रशियाविरुद्ध कठोर निर्बंध घालण्याची मागणी अमेरिका आणि उर्वरित जगाकडे आहे.

‘दबावाशिवाय काहीही बदल होणार नाही’

युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांचे चीफ ऑफ स्टाफ आंद्रेई येरमाक यांनी टेलिग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी “दबावाशिवाय काहीही बदलणार नाही,” असे म्हटले आहे. रशिया आणि त्यांची मित्र राष्ट्रं पाश्चात्य देशांतही अशाच प्रकारे नृशंस हल्ल्याची योजना आखतील. मॉस्को तोपर्यंत लढले जोपर्यंत त्यांच्याकडे शस्त्रे तयार करण्याची क्षमता आहे.

दुसरीकडे, रशियाने उलट दावा केला की त्यांनी अवघ्या चार तासांत ९५ युक्रेनियन ड्रोन पाडले आहेत, त्यापैकी १२ मॉस्को शहराजवळ होते. हा संघर्ष आणखीन चिघळताना  दिसत आहे.. या हल्ल्यादरम्यान, शांतता चर्चेचा मार्ग मोकळा होण्यासाठी युक्रेनने ३० दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी प्रत्येकी १,००० कैद्यांच्या देवाणघेवाणीची प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे.

सणाचे दिवस संपल्यानंतर हल्ले सुरु

रशियाने गुड फ्रायडे निमित्ताने ख्रिस्ती धार्मिक सणानिमित्ताने युक्रेनवर हल्ले न करण्याचा संकेत पाळला होता. मात्र हा सणाचे दिवस संपल्यानंतर लागलीच पुन्हा रशियाने हल्ले सुरु केल्याने आता या युद्धाला गंभीर वळण लागले आहे. मध्यंतरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना अमेरिकेत चर्चेला बोलावून युद्ध थांबविण्याचा सल्ला दिला होता.त्यावर झेलेन्स्की यांनी रशिया हल्ले थांबवले याची गॅरंटी कोण देणार असा सवाल करीत या चर्चेतून माघार घेतली होती.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.