राष्ट्राध्यक्षांना थेट एका रात्रीत हटवले सत्तेतून, जगात मोठी खळबळ, थेट नजरकैदेत ठेवत..
दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे या देशात मोठे राजकीय उलटफेर झाली. देशाच्या अध्यक्षाला एका रात्रीत पदावरून निघावे लागले. लोकांमध्ये प्रचंड असंतोष बघायला मिळत आहे. देशात मोठे बँकिंग संकट उभे आहे.

दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे या देशात मोठी खळबळ उडाली. एका मोठ्या बँकिंग संकटामुळे राजकीय उलटफेर झाले. युएनो (Ueno) या डिजिटल बँकेच्या कोसळण्यानंतर, राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांना आपले पद एका रात्रीत सोडावे लागले. माजी उपराष्ट्रपती पेड्रो अलियाना यांनी शुक्रवारी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आणि सँटियागो पेना यांची जागा घेतली. हेच नाही तर सँटियागो पेना यांची राष्ट्राध्यक्षपदावरून हाकलपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. बँकांचे कारभार बंद करण्यात आल्याने ग्राहकांची मोठी रक्कम अडकून पडली आहे. लोकांमध्ये भीतीची वातावरण असून अनेकांनी बँकेबाहेर मोठी गर्दी बघायला मिळतंय. या प्रकरणात सार्वजनिक निधीचा वापर आणि बँकेला राजकीय संरक्षण पुरवल्याच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. ही चाैकशी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत ग्राहकांना व्यवहार करता येणार नाहीत.
शुक्रवारी पॅराग्वेच्या सिनेटमध्ये राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांच्यावरील महाभियोगाबाबत मतदान घेण्यात आले. 44 खासदारांनी त्यांना पदावरून काढण्यासाठी मतदान केले.खासदारांनी त्यांचा चुकीचा व्यवहार आणि बँकांच्या व्यवहाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केली होती. पेना यांनी गुरूवारी राजीनामा देण्यावर भाष्य केले होते. पण संसदेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता.
विरोधी पक्षातील खासदारांचे म्हणणे होते की,त्यांना जर राजीनामा देऊ दिला तर माजी ते माजी राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या आजीवन सिनेट सदस्यत्वाचा आणि त्यासोबत मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. पेना यांनी आपल्या निरोप संदेशात मोठे भाष्य केले. त्यांनी म्हटले की, देशातील राजकीय अस्थिरता आणि फूट अधिक वाढवायची नाही. त्यांनी आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले.
आपल्यावर चुकीचे आरोप करण्यात आल्याचेही त्यांनी यादरम्यान भाष्य केले. सँटियागो पेना यांना पदावरून हटवल्यानंतर शुक्रवारी माजी उपराष्ट्राध्यक्ष पेड्रो अलियाना यांनी पॅराग्वेचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. आता पेना यांचा उर्वरित कार्यकाळ तेच पूर्ण करतील. 2028 पर्यंत त्यांच्याकडे अध्यक्षपद असेल. पेना यांना यादरम्यानच्या काळात नजरकैदेत राहावे लागेल. या सर्व राजकीय घडामोडींनी मोठी खळबळ उडाली.