AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्राध्यक्षांना थेट एका रात्रीत हटवले सत्तेतून, जगात मोठी खळबळ, थेट नजरकैदेत ठेवत..

दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे या देशात मोठे राजकीय उलटफेर झाली. देशाच्या अध्यक्षाला एका रात्रीत पदावरून निघावे लागले. लोकांमध्ये प्रचंड असंतोष बघायला मिळत आहे. देशात मोठे बँकिंग संकट उभे आहे.

राष्ट्राध्यक्षांना थेट एका रात्रीत हटवले सत्तेतून, जगात मोठी खळबळ, थेट नजरकैदेत ठेवत..
South Americ
| Updated on: Nov 07, 2026 | 7:56 AM
Share

दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे या देशात मोठी खळबळ उडाली. एका मोठ्या बँकिंग संकटामुळे राजकीय उलटफेर झाले. युएनो (Ueno) या डिजिटल बँकेच्या कोसळण्यानंतर, राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांना आपले पद एका रात्रीत सोडावे लागले. माजी उपराष्ट्रपती पेड्रो अलियाना यांनी शुक्रवारी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आणि सँटियागो पेना यांची जागा घेतली. हेच नाही तर सँटियागो पेना यांची राष्ट्राध्यक्षपदावरून हाकलपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. बँकांचे कारभार बंद करण्यात आल्याने ग्राहकांची मोठी रक्कम अडकून पडली आहे. लोकांमध्ये भीतीची वातावरण असून अनेकांनी बँकेबाहेर मोठी गर्दी बघायला मिळतंय. या प्रकरणात सार्वजनिक निधीचा वापर आणि बँकेला राजकीय संरक्षण पुरवल्याच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. ही चाैकशी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत ग्राहकांना व्यवहार करता येणार नाहीत.

शुक्रवारी पॅराग्वेच्या सिनेटमध्ये राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांच्यावरील महाभियोगाबाबत मतदान घेण्यात आले. 44 खासदारांनी त्यांना पदावरून काढण्यासाठी मतदान केले.खासदारांनी त्यांचा चुकीचा व्यवहार आणि बँकांच्या व्यवहाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केली होती. पेना यांनी गुरूवारी राजीनामा देण्यावर भाष्य केले होते. पण संसदेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता.

विरोधी पक्षातील खासदारांचे म्हणणे होते की,त्यांना जर राजीनामा देऊ दिला तर माजी ते माजी राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या आजीवन सिनेट सदस्यत्वाचा आणि त्यासोबत मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. पेना यांनी आपल्या निरोप संदेशात मोठे भाष्य केले. त्यांनी म्हटले की, देशातील राजकीय अस्थिरता आणि फूट अधिक वाढवायची नाही. त्यांनी आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

आपल्यावर चुकीचे आरोप करण्यात आल्याचेही त्यांनी यादरम्यान भाष्य केले. सँटियागो पेना यांना पदावरून हटवल्यानंतर शुक्रवारी माजी उपराष्ट्राध्यक्ष पेड्रो अलियाना यांनी पॅराग्वेचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. आता पेना यांचा उर्वरित कार्यकाळ तेच पूर्ण करतील. 2028 पर्यंत त्यांच्याकडे अध्यक्षपद असेल. पेना यांना यादरम्यानच्या काळात नजरकैदेत राहावे लागेल. या सर्व राजकीय घडामोडींनी मोठी खळबळ उडाली.

Follow Us
सहकारी संस्थांवर सरकारचा मोठा निर्णय; 500 कोटींच्या उलाढालीच्या....
Gokul Milk Union : सहकारी संस्थांवर सरकारचा मोठा निर्णय; 500 कोटींच्या उलाढालीच्या संस्थांवर...
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!