इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
मध्य पूर्वेतील संघर्षाने गॅसने पुरवठ्यात अडथळा आला आहे. यामुळे गॅसच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. सौदी अरबने त्यांच्याकडील गॅसचे दर वाढवल्याने भारत आणि चीन सारख्या प्रचंड एलपीजी लागणाऱ्या देशांनी आता आपली रणनिती बदलली आहे.

इराण युद्धामुले मध्य पूर्वेतील तेलाच्या पुरवठ्यात मोठा अडथळा आला आहे. ज्यामुळे आशियाई देशांनी अमेरिकेकडून एलपीजीची (LPG)आयात वाढविली आहे. भारत आणि चीनसारखे आशियातील सर्वात मोठे एलपीजी आयात करणारे देश आता अमेरिका आणि अन्य क्षेत्रातून वेगाने गॅसचे कार्गो मागवत आहेत.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते ट्रेडर्स आणि विश्लेषकांनी सांगितले की भारत आणि चीनच्या खरेदीमुळे स्पॉट प्रीमियम रेकॉर्ड स्तरावर पोहचले आहे. मध्य पूर्वेतील पुरवठा कमी झाल्याचा परिणाम आशियातील पेट्रोकेमिकल उत्पादकांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. ज्यामुळे त्यांना उत्पादन घटवावे लागले आहे. गॅसच्या किंमती वाढल्याने आशियातील लाखो घरातील किचन बजेट कोलमडले आहे. भारत आणि चीन मध्य पूर्वेतून एलपीजी आयात करणारे सर्वात मोठे देश आहेत.
एनालिटिक्स फर्म केप्लरच्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये मध्य पूर्वेतून एलपीजी निर्यात ७३ टक्के घसरुन ४.१९ लाख बॅरल प्रतिदिन उरला आहे. जो गेल्या महिन्याहून खूप कमी आहे.
सौदीने वाढवली एलपीजीची किंमत
मध्य पूर्वेतील पुरवठा बाधित झाला असताना एप्रिलमध्ये आखाती क्षेत्रातून लोड होणारे प्रोपेन आणि ब्युटेनचे स्पॉट प्रीमियम खूपच वाढला आहे. प्रायसिंग एजन्सी Argus यांनी सांगितले की ३० मार्चला गेल्या महिन्याच्या सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राईस स्वॅप्सच्या तुलनेत यांची किंमत वाढून २५० डॉलर
प्रति मेट्रीक टनाचा रेकॉर्ड स्तरावर पोहचली आहे.
पुरवठ्याच्या कमतरता सुरु असताना सौदी अरामकोने एप्रिलसाठी आपल्या अधिकृत विक्री किंमत (OSP)मोठ्या प्रमाणात वाढवली. एप्रिलमध्ये प्रोपेनची किंमत २०५ डॉलर वाढून ७५० डॉलर प्रति टन झाली आहे. तर ब्युटेन २६० डॉलर वाढून ८०० डॉलर प्रति टन पोहचला आहे.
फायनान्शिय सर्व्हीसेस प्लॅटफॉर्म Marex मध्ये पेट्रोकेमिकल ट्रेडिंगचे ग्लोबल हेड वासुदेव बालागोपाल यांनी सांगितले की भारतासारखा मोठी एलपीजी आयात करणारा देश आता त्याच्या सोर्सिंग रणनितीत विविधता आणत आहे. आणि आखाती पुरवठ्यासोबत अमेरिका, नॉर्वे, कॅनडा आणि अन्य क्षेत्रातून देखील खरेदी वाढवत आहे.
भारतात LPG पुरवठ्याची काय स्थिती ?
भारतात एलपीजीचा पुरवठा सामान्य बनल्याचे सरकारचे म्हणणे आहे. इराण युद्धानंतरही स्ट्रेट ऑफ होर्मुझ येथून भारतात एलपीजीचा पुरवठा सुरु आहे असे पेट्रोलियम सचिव नीरज मित्तल यांनी गुरुवारी सांगितले आहे.
ऊर्जा सुरक्षा आणि भारतात वाढती गॅस मागणी यावर आयोजित एका परिषदेत बोलताना मित्तल यांनी सांगितले की व्यत्ययाच्या शंकेनंतरही सतत जहाजे स्ट्रेटमधून येत आहेत. ते म्हणाले की मला कुठे काही समस्या दिसत नाही. घरगुती पुरवठा १०० टक्के कायम आहे. जहाजे निरंतर येत आहेत. जेव्हा युद्ध सुरु होते तेव्हाही पुरवठा सुरु होता.प्रवासाला वेळही सामान्य लागत आहे. स्ट्रेट पार करण्यात कोणताही उशीर होत नाहीए.
भारताची सुमारे ९० टक्के कच्च्या तेलाची आयात स्ट्रेट ऑफ होर्मुझद्वारे होते. त्यामुळे देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हा मार्ग महत्वाचा आहे. भारत सध्या ४१ देशांकडून कच्चे तेल, ३० देशांकडून नैसर्गिक गॅस आणि १३ देशांकडून एलपीजी आयात करत आहे असेही मित्तल यांनी सांगितले.