
अमेरिका सौदी अरेबियाला F-35 फायटर जेट विकणार. पण ही विमानं इस्रायलकडे असलेल्या F-35 इतकी अत्याधुनिक नसतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना ही माहिती दिली आहे. Axios ने अमेरिकी आणि इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. मिडल ईस्टमध्ये इस्रायलच लष्करी वर्चस्व आणि क्षमता कायम राखण्यासाठी अमेरिकेने सौदी अरेबियासोबत अशा प्रकारचा करार केला आहे. सौदी अरेबिया्ला जी F-35 फायटर जेट्स मिळणार, त्यांची क्षमता कशी असेल? जाणून घ्या. रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेकडून सौदी अरेबियाला दिल्या जाणाऱ्या F-35 मध्ये इस्रायली F-35 सारखी अत्याधुनिक सिस्टिम नसेल. म्हणजे शस्त्रास्त्र, इलेक्ट्रॉनिक युद्ध उपकरणं, रडार जॅमिंग टेक्निक. मागच्या आठवड्यात इस्रायलने सौदी आणि अमेरिकेमधील या व्यवहारावर आक्षेप नोंदवला होता. कारण यामुळे इस्रायलचा धोका वाढणार होता.
सौदी क्राऊन प्रिन्स अलीकडेच अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी या व्यवहारावर शिक्कामोर्तब झालं. सौदी अरेबिया अमेरिकेकडून 300 रणगाडे सुद्धा विकत घेणार आहे अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिका-सौदी करारामुळे QME धोरण प्रभावित होऊ नये अशी इस्रायलची मागणी आहे. QME म्हणजे मिडल ईस्टमध्ये इस्रायलला लष्करी दृष्टया बळकट ठेवणं. अमेरिकेत तसा कायदाच आहे. इस्रायलकडे सध्या F-35 ची दोन स्क्वाड्रन आहेत. तिसऱ्या स्क्वाड्रनची ऑर्डर दिली आहे. सौदी अरेबियाला दोन स्क्वाड्रन दिले जातील. पुढच्या काही वर्षात सौदीला ही लढाऊ विमानं मिळतील.
भारताला सुद्धा यामुळे धोका
क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या वॉशिंग्टन दौऱ्यादरम्यान F-35 च्या करारावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं असं Bloomberg ने 14 नोव्हेंबरच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. The New York Times नुसार, पेंटागनला सौदी अरेबियाला ही विमानं मिळाली तर मध्य पूर्वेत इस्रायलच लष्करी वर्चस्व धोक्यात येईल ही भिती होती. Axios च्या 15 नोव्हेंबरच्या रिपोर्टनुसार इस्रायल अमेरिकेकडे सुरक्षेची हमी मागू शकतो.
F-35 ही आजच्या तारखेला जगातील सर्वात अत्याधुनिक रडारला न सापडणारी विमानं आहेत. भारताला सुद्धा यामुळे धोका आहे. कारण पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एक करार झाला आहे. त्यानुसार दोघांपैकी एकावर हल्ला हा दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाणार आहे. अशावेळी F-35 विमानांचा भारताविरोधात सुद्धा वापर होऊ शकतो.