Saudi Arabia-Houthi Rebel : हुती बंडखोरांनी अखेर सौदी अरेबियात नको त्या ठिकाणी मिसाइल डागले, भारतासह सगळं जग टेन्शनमध्ये आलं

Saudi Arabia-Houthi Rebel : मागच्या काही दिवसांपासून सौदी अरेबिया आणि हुती बंडखोरांमध्ये संघर्ष सुरु आहे. ही लढाई आता खतरनाक वळणावर येऊन पोहोचली आहे. भारतीय शेअर बाजारातही याचे पडसाद उमटू शकतात. सगळ्या जगाचं टेन्शन वाढलं आहे.

Saudi Arabia-Houthi Rebel : हुती बंडखोरांनी अखेर सौदी अरेबियात नको त्या ठिकाणी मिसाइल डागले, भारतासह सगळं जग टेन्शनमध्ये आलं
Saudi Crown Prince
| Updated on: Oct 14, 2026 | 8:40 AM

सौदी अरेबिया आणि इराण समर्थित हुती बंडखोरांमध्ये सुरु असलेला संघर्ष धोकादयाक वळणावर पोहोचला आहे.मंगळवारी रात्री उशिरा सौदी अरेबियाच्या ‘सौदी अरामको’ कंपनीच्या प्रशासकीय परिसरात बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला झाला. ‘सौदी अरामको’ ही जगातली सर्वात मोठी तेल कंपनी आहे. सौदीच्या पूर्वेकडील शहर धहरानमध्ये ‘सौदी अरामको’ कंपनी स्थित आहे. या हल्ल्यानंतर इमारतीला आग लागली असं सौदी अरेबियाची सरकारी वृत्तसंस्था एसपीएने बुधवारी म्हटलं आहे. पण यात जिवीतहानी झालेली नाही. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार मिसाइल हल्ल्यात कंपनीच्या वरच्या तीन मजल्याचं नुकसान झालं आहे. इमारतीत आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. अरामकोचं हे ऑफिस मुख्य संचालन केंद्र आहे. जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेली सौदी अरामको हा सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. सौदी मधील तेल विहिरी, पाइपलाइन, रिफायनरी आणि निर्यात टर्मिनल या कंपनीच्या अधिकार क्षेत्रात येतात.

‘सौदी अरामको’ कंपनीवर मिसाइल हल्ला हा भारतासह सगळ्या जगाची चिंता वाढवणारा विषय आहे. कारण सौदी अरामको जगातील एक प्रमुख तेल पुरवठादार कंपनी आहे. यामुळे कच्चा तेलाचा तुटवडा निर्माण होऊन जगभरात तेलाच्या किंमती वाढू शकतात. भारतीय शेअर बाजारावरही या हल्ल्याचे पडसाद उमटू शकतात. भारतही सौदी अरेबियाकडून तेल खरेदी करतो. हुतीचे काही हल्ले फेल झाले. काही मिसाइल्स धहरानच्या आकाशातच नष्ट करण्यात आली. त्याचे तुकडे निवासी भागात पडले. यामुळे किती नुकसान झालय त्याची माहिती समोर आलेली नाही. रियाद आणि दक्षिण भागात मिसाइल तसेच ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Loading...

गंभीर परिणाम भोगावे लागतील

मंगळवारी सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. वारंवार हल्ले करणाऱ्या हुतींना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे. रिपोर्ट्नुसार मागच्या आठवड्याभरापासून हुती बंडखोर सौदी अरेबियातील महत्वाच्या ठिकाणांवर मिसाइल आणि ड्रोन हल्ले करतायत. यात राजधानी रियादचा एअरपोर्ट सुद्धा आहे. शनिवारी रियाद इंटरनॅशनल एअरपोर्टवर मिसाइल हल्ला झाला. यात 13 नागरिकांचा मृत्यू झाला. मागच्या एका दशकातील सौदी अरेबियावर झालेला हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला आहे. सतत होणाऱ्या या हल्ल्यामुळे सौदीमधील हवाई सेवा प्रभावित झाली आहे. सौदी अरेबियात एका मोठ्या ऊर्जा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असताना हा हल्ला झाला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us