
Sheikh Hasina Verdict : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेश इंटरनॅशनल ट्रिब्युनल कोर्टाने थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2024 सालचा बांगलादेशातील हिंसाचार आणि मृत्यूंप्रकरणी हा निकाल देण्यात आला आहे. दरम्यान, या निकालानंतर बांगलादेशात खळबळ उडाली आहे. बांगलादेशात शेख हसीना यांचे लाखोंनी समर्थक आहेत. असे असताना त्यांना थेट फाशी ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे आता या देशात नेमके काय होणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण ट्रिब्युनल कोर्टाचा हा निकाल येण्याआधी शेख हसीना यांनी त्यांच्या समर्थकांना एक संदेश दिला आहे. या संदेशात त्यांनी केलेल्या विधानामुळे आता नेमकं काय होणार? पुन्हा बांगलादेशात अराजक माजणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बांगलादेश इंटरॅनशल ट्रिब्यूनल कोर्टाने शेख हसिना यांना मानवी गुन्ह्यांत दोषी ठरवले आहे. त्यांना या प्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल येण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. सोबतच त्यांनी सध्याच्या बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारवरही सडकून टीका केली आहे. त्यांनी आपले कार्यकर्ते, समर्थकांना एक संदेशही दिला आहे. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे आहेत. सोबतच मला कोर्टाच्या कोणत्याही निकालाने काहीही फरक पडत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. सोबतच मी जिवंत आहे, भविष्यातही जिवंत राहणार आहे. मी लोकांच्या कल्याणासाठी काम करत राहणार, असे म्हणत पुढची लढाई चालूच राहील, असे संकेत दिले.
‘एनडीटीव्ही’ या वृत्तसंस्थेवर याबाबतचे सविस्तर वृत्त देण्यात आले आहे. कोर्टाचा निकाल येण्यापूर्वी शेख हसीना आपल्या समर्थकांना एक ऑडिओ संदेश दिला आहे. या संदेशामध्ये मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकालला आवामी लीग पक्षाला नेस्तनाबूत करायचे आहे. मात्र ते काही सोपे नाही. आवामी लिग हा पक्ष तळागाळातून वर आलेला आहे. मोजक्या बलशाली लोकांच्या मदतीने हा पक्ष तयार झालेला नाही, असे शेख हसीना आपल्या ऑडिओ संदेशात म्हणाल्या आहेत.
सोबतच बांगलादेशातील लोक भ्रष्टाचारी, अतिरेकी आणि खुनी युनूस यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना बदल काय असतो ते दाखवून देतील. बांगलादेशातील लोकच न्याय देतील, असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे. ट्रिब्यूनल कोर्टाचा निकाल काहीही आला तरी मला त्याची पर्वा नसेल, असेच शेख हसीना यांना सूचित करायचे होते. दरम्यान, शेख हसीना यांना थेट फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्याने पुढे नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शेख हसीन यांच्याकडे या निकालाला आव्हान देण्याचे काही कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आता शेख हसीना या पर्यायांचा वापर करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, शेख हसीना यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली असली तरी त्या सध्या भारतात आहेत. त्यामुळे या शिक्षेची अंमवलबजावणी करण्यासाठी बांगलादेशला प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार शेख हसीना यांना भारतातून बांगलादेशात पाठवले जाईल. या प्रकरणात भविष्यात नेमके काय काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.