
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दाैऱ्यावर असून त्यांच्यासोबत रशियाचे तब्बल 7 मंत्रीही भारतात दाखल झाले आहेत. पुतिन यांच्या भारत दाैऱ्यामुळे अमेरिकेला चांगल्याच मिरच्या लागल्या आहेत. हेच नाही तर भारतावर अमेरिका अजून काही निर्बंध लादण्याची शक्यता आहे. भारताने अमेरिकेला निर्णय घेण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता अमेरिका आग्रही आहे. मात्र, पुतिन यांच्या भारत दाैऱ्यानंतर हे स्पष्ट झाले की, भारत रशियाकडून अधिक प्रमाणात आता तेल खरेदी करणार आहे. भारताचा मुख्य ऊर्जा पुरवठादार रशिया आहे. मात्र, अमेरिकेमुळे भारतावर दबाव आहे. या काळात रशिया भारतासोबत खंबीरपणे उभा आहे. व्लादिमीर पुतिन हे जगातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या सुरक्षेची खास काळजी घेतली जाते.
पुतिन यांच्या दोन दिवसीय भारत दाैऱ्याबद्दल जगाला कल्पना होती. हेच नाही तर पुतिन भारतात नेमके कधी पोहोचणार हे देखील जवळपास लोकांना माहितीये. मात्र, यादरम्यान आकाशात मोठा गेम सुरू होता. अख्ये जग पुतिन यांचे विमान शोधत होते. पुतिन यांच्या विमानाच्या ताफ्यावर जगाच्या नजरा होत्या. पुतिन यांचे विमान असे तसे नसून अत्यंत खास आणि पूर्ण सुरक्षित आहे. आता नुकताच एक मोठा रिपोर्ट पुढे आला आहे.
पुतिन यांचे फ्लाइंग क्रेमलिन दोन एकसारखे विमान भारताच्या दिशेने येत होते. दोन्ही विमानांचा मोठा लपंडाव सुरू होता. कधी एका विमानाचा ट्रान्सपॉन्डर अॉन व्हायचा तर कधी दुसऱ्याचा. हेच नाही तर अगदी थोड्या थोड्यावेळाने दोन्ही विमानांचे लोकेशनही बदलत होते. हा खेळ तब्बल साडेसहा तास आभाळात सुरू होता. थेट पुतिन यांचे फ्लाइंग क्रेमलिन दिल्ली विमानतळावर उतरले.
व्लादिमीर पुतिन यांचे सर्वाधिक ट्रक केले गेलेले विमान ठरले आहे. पुतिन हे कायमच जगाच्या नजरेतून लपून प्रवास करतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये जगाला त्यांच्या प्रवासाचे खरे लोकेशन कळू दिले जात नाही. पुतिन यांच्यासोबत फ्लाइंग क्रेमलिन दोन एकसारखी विमाने उडत होती. खरे कोणते विमान ज्यात पुतिन आहेत, हे जगाला शेवटपर्यंत समजलेच नाही. विशेष म्हणजे दोन्ही विमानांचे ट्रान्सपॉन्डर काम करत होते. कधी या विमानाचे ट्रान्सपॉन्डर काम करायेच तर कधी दुसऱ्या. हा विमानात प्रत्येक गोष्ट आहे. मिसाईल देखील या विमानात आहेत.