AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिल्याबद्दल स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांकडून PM मोदींचे अभिनंदन

PM Modi Slovakia Visit : स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी भारताचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान बनल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. दोन्ही देशांनी संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिल्याबद्दल स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांकडून PM मोदींचे अभिनंदन
Narendra Modi Robert FicoImage Credit source: X
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 15, 2026 | 6:18 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासोबत प्रतिनिधी स्तरावरील चर्चा केली. ही एखाद्या भारतीय पंतप्रधानांची स्लोव्हाकियाला दिलेली ही पहिलीच अधिकृत भेट ठरली आहे. ब्रातिस्लावा येथे सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान फिको यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. फिको म्हणाले की, ‘माननीय पंतप्रधान, भारताचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान बनल्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. हे एका राजकीय चमत्कारासारखे आहे.’

पंतप्रधान मोदींचे केले कौतुक

स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घकाळ टिकून राहिलेल्या लोकप्रियतेचे आणि नेतृत्वाचे कौतुक करत त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यकाळाचे महत्त्व अधोरेखित केले. यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी रॉबर्ट फिको यांचे आभार मानले आणि त्यांचा उल्लेख ‘अनुभवी नेता तसेच भारताचा खरा मित्र’असा केला. तसेच भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील संबंधांना आता सर्वसमावेशक भागीदारी दर्जा देण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.

काय म्हणाले PM मोदी?

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘स्लोव्हाकियाची मैत्री आणि दृढ वचनबद्धता यामुळे भारत-स्लोव्हाकिया संबंधांना नव्या उंचीवर नेण्यात विशेष योगदान मिळाले आहे. आज त्यांची भेट घेण्याची आणि आपल्या संबंधांतील ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे. भारतीय पंतप्रधानांची स्लोव्हाकियाला झालेली ही पहिलीच भेट आहे. या ऐतिहासिक प्रसंगी आम्ही द्विपक्षीय संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीच्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय परस्पर विश्वास, समान प्राधान्यक्रम आणि भविष्यासाठीच्या सामायिक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.’

सांस्कृतिक संबंधांचेही कौतुक

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘दोन्ही देशांतील सांस्कृतिक आणि लोकांमधील संबंध हे द्विपक्षीय नात्याचा मजबूत पाया आहेत. भारतीय प्राचीन उपनिषदांचे स्लोव्हाक भाषेत झालेले भाषांतर हे आपल्या सांस्कृतिक जवळीकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. स्लोव्हाकियामध्ये राहणारे भारतीय वंशाचे नागरिक तेथील अर्थव्यवस्था आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.’

अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात मोठी संधी

पंतप्रधान मोदी यांनी अवकाश क्षेत्रात भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यात सहकार्य वाढवण्याच्या मोठ्या संधी असल्याचे नमूद केले. ‘भारताचे अवकाश क्षेत्र आज अभूतपूर्व वेगाने प्रगती करत आहे. या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी मी स्लोव्हाक कंपन्यांना आमंत्रण देतो असे म्हणत नागरी अणुऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रही दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Follow Us
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...