
21 व्या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण तब्बल 6 मिनिटे 23 सेकंद चालणार असून यादरम्यान दिवसा सर्वत्र फक्त आणि फक्त अंधार असेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, 100 वर्षांत असे पहिल्यांदा बघायला मिळेल. इतक्या मोठ्या कालावधीचे पूर्ण सूर्यग्रहण पुन्हा लवकर बघायला मिळणार नाही. हा दिवस खगोलशास्त्रज्ञांसाठी मोठा आणि महत्वाचा असणार आहे. यादरम्यान सूर्याच्या भोवती अनेक बदल अनुभवता येतील. या दिवशी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकेल आणि दिवसा अंधार होईल. हेच नाही तर यादरम्यान तापमान देखील 10 अंशांच्या कमी होऊ शकते. वाऱ्याची दिशाही बदलेल. 21 व्या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असणार आहे. दिवसा आकाशातील तारेही चमकतील. पूर्ण सूर्यग्रहणादरम्यान, सूर्य अंधूक दिसेल. शुक्र, बुध आणि काही तारे देखील दिसतील.
सुमारे साडेसहा मिनिटे जग पूर्ण अंधारात बुडेल. शास्त्रज्ञांच्या मते, दर 18 महिन्यांनी एकदा पूर्ण सूर्यग्रहण होते. परंतु इतका जास्त वेळ टिकणारे ग्रहण फारच दुर्मिळ असतात. 2027 चे ग्रहण देखील खास आहे, कारण ते एका जास्त लोकसंख्या असलेल्या देशातून जात आहे आणि दिसत आहे. ही घटना खगोलशास्त्रीय अभ्यास, तापमानातील बदल आणि प्राण्यांच्या वर्तन संशोधनासाठी महत्वाची आहे.
संशोधन संस्था आणि अंतराळ संस्था याला एखाद्या वैज्ञानिक प्रयोगशाळेप्रमाणे थेट घटना मानत आहेत. ग्रहण सुरू होण्याच्या 60-89 मिनिटे आधी चंद्र सूर्याच्या कडेला स्पर्श करण्यास सुरुवात करेल. तेज हळूहळू कमी होईल: थोड्याच वेळात सूर्य एका पातळ फटीसारखा दिसेल. सुर्याचे तेज अचानक नाहीसे होईल आणि तापमान कमी होईल. हे सर्व साधारणपणे 6 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सुरू राहिल. यादरम्यान शाळा बंद ठेवण्याची शक्यता असेल.
यानंतर तासाभरात सूर्य हळूहळू पूर्वीसारखा दिसू लागेल आणि वातावरण सामान्य होईल. हा संपूर्ण वेळ जगभरातील वेधशाळांकडून नोंदवला जाईल आणि परीक्षण केले जाईल. नासाच्या नोंदींवरून पुढील असा दीर्घकाळचा अंधार 22 व्या शतकात येऊ शकतो. म्हणूनच, ही घटना या पिढीतील सर्वात मोठा खगोलीय मानली जात आहे. 2 ऑगस्ट 2027 रोजी सहा मिनिटांचा अंधार असेल. भारताच्या काही भागात आंशिक सूर्यग्रहण दिसू शकते, परंतु ते खूप मर्यादित आहे. जगातील इतर देशांमध्ये हे ग्रहण दिसेल.