काही तरी मोठं घडणार? इराणने एकाचवेळी लाखो नागरिकांना पाठवला ‘तो’ मेसेज? जगभरात खळबळ

गेल्या जून महिन्यात इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यानंतर आता इराणने मोठा निर्णय घेतला आहे, इराणच्या या निर्णयाची जगभरात चर्चा सुरू आहे.

काही तरी मोठं घडणार? इराणने एकाचवेळी लाखो नागरिकांना पाठवला तो मेसेज? जगभरात खळबळ
अयातुल्ला अली खामेनेई
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 15, 2025 | 8:10 PM

इराण आणि इस्रायलमध्ये यावर्षी जून महिन्यात भीषण युद्ध झालं, बारा दिवस हे युद्ध सुरू होतं, या युद्धामध्ये दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं. मात्र अजूनही इराण अलर्ट मोडमध्ये असून, ज्या पद्धतीनं हालचाली सुरू आहेत, ते पहाता इराण एखाद्या मोठ्या युद्धाची तयारी करत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शुक्रवारी इराणने संपूर्ण देशभरात इमरजन्सी फोन अलर्टची चाचणी केली, या टेस्टमध्ये एकाचवेळी देशभरातील लाखो नागरिकांना मोबाईलवरून मेसेज पाठवण्यात आला आहे. देशात जर काही आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तर त्यासाठी नागरिक अलर्ट मोडवर असावेत यासाठी हा एक तयारीचा भाग आहे.

टेस्ट का केली?

गेल्या जून महिन्यात इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. युद्धकाळात इराणच्या इमरजन्सी यंत्रणामधील अनेक त्रुटी समोर आल्या, ज्याचा मोठा फटका हा युद्ध काळात इराणला बसला आहे. युद्ध काळात अत्यावश्यक मॅसेज जनतेपर्यंत तातडीने पोहोचवण्यासाठी इराणला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, नागरिकांना मेसेज वेळेत गेले नाहीत, त्यामुळे काही जणांचा या युद्धात मृत्यू देखील झाला. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेकडून इराणच्या दोन न्यूक्लिअर साईटवर मिसाईल हल्ला करण्यात आला होता, त्यामुळे आता इराणने आपली कम्युनिकेशन सिस्टम अपडेट करण्याचा निर्णय घेतला असून याचा एक भाग म्हणून आता इराणकडून एकाच वेळी लाखो लोकांना अलर्टचा मॅसेज जाऊ शकतो अशा यंत्रणेची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

अलर्ट मॅसेजमध्ये काय म्हटलं

इराणच्या सरकारने एकाचवेळी आपल्या अनेक नागरिकांना एक टेस्ट मॅसेज पाठवला आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे की, समजा पुढील काही महिन्यात देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर नागरिकांनी सतर्क असावं, या उद्देशानं ही टेस्ट करण्यात आली आहे, या माध्यमातून एकाचवेळी लाखो नागरिकांना मॅसेज पाठवणं शक्य होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा इऱाण युद्धाच्या तयारीमध्ये आहे का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.