
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्याने संबंध ताणले गेले आहेत. काही अमेरिकेचे नेते देखील भारताच्यासोबत उभे राहिले असून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करत आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे इतके दिवस चांगले राहिलेले संबंध खराब होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावा पुढे भारत झुकणार नाहीये आणि तसा सल्ला अमेरिकेतील काही नेत्यांनी भारताला दिलाय. मात्र, भारतावर 50 टक्के कर अमेरिकेने लावल्यानंतर भारताच्या शेजारी असलेले देश भारताच्या विरोधात बोलत आहेत.
भारताचा शेजारी देश श्रीलंका ज्यावेळी अडचणीत सापडली होती, त्यावेळी भारत श्रीलंकेच्या मदतीला धावून गेला. मात्र, आता अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताच्या बाजूने श्रीलंका अजूनही उभी राहिली नाहीये. श्रीलंकेचे खासदार हरीश डी सिल्वा यांनी त्यांच्या सरकारला सांगितले आहे की, अमेरिकेसोबतच्या तणावात त्यांच्या देशाने भारतासोबत उभे राहिले पाहिजे. कारण आपल्या वाईट काळात भारत आपल्यासोबत उभा होता.
भारत आणि अमेरिकेतील वाढत्या तणावावरील चर्चेदरम्यान, श्रीलंकेच्या संसदेत हरीश सिल्वा म्हणाले की, भारतासोबत उभे राहण्याऐवजी आमचे सरकार त्यांची थट्टा करत आहे. हे अजिबातच बरोबर नाहीये. आपण भारताला पाठिंबा दिला पाहिजे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी आपल्या कठीण काळात आपली साथ दिलीये. स्वत:च्या सरकारला फटकारत त्यांनी पुढे म्हटले की, डोनाल्ड ट्रम्पच्या व्यापार शुल्काविरुद्ध भारताच्या धाडसी भूमिकेची आपण अशी थट्टा उडवू नये.
🇱🇰🇮🇳 Called out the Govt in @ParliamentLK for mocking India’s bold stand against Trump’s trade tariffs. #India, our true ally, stood by us in our toughest times. We should honor their fight, not laugh. India’s courage inspires Asia! #StandWithIndia #SriLanka #TrumpTariffs pic.twitter.com/HUmMf1lht2
— Harsha de Silva (@HarshadeSilvaMP) August 10, 2025
मुळात म्हणजे भारत आपला खरा मित्र आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी आपल्यावर वाईट काळ होता, त्यावेळी भारत पाठीशी उभा होता. विशेष म्हणजे आता ते ज्यापद्धतीने संघर्ष करत आहेत, त्यांचे काैतुक केले पाहिजे. ते ज्यापद्धतीने अमेरिकेसोबत संघर्ष करत आहेत, ते आशियासाठी प्रेरणादायी नक्कीच आहे, असे हरीश डी सिल्वा यांनी म्हटले आहे. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्याने भारताच्या मदतीला अनेक देश धावून आल्याचे बघायला मिळतंय. आता श्रीलंका नेमकी काय भूमिका घेते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.