स्विस बँकेतील रक्कमेसह पैसेवाल्यांची नावं होणार जाहीर; स्वित्झर्लंड भारतीयांच्या नावाची यादीच देणार…
स्वित्झर्लंडने भारतासह 101 देशांसोबत सुमारे 34 लाख आर्थिक खात्यांची माहिती दिली आहे.

नवी दिल्लीः गेल्या अनेक दिवसांपासून स्विस बँकेतील (swiss bank) पैसा आता भारतात येणार अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून होती. आता स्वित्झर्लंडमध्ये काळा पैसा ठेवणाऱ्या भारतीयांची संख्याही काही कमी नाही. त्यामुळे जगातील विविध देशांमध्ये राहणारे लोक आपले दोन नंबरचा पैसा स्विस बँकेत लपवून ठेवत असल्याने आता भारत सरकारही त्रस्त झाले आहे. त्यामुळे आता भारत सरकारलाच (Indian government) स्वित्झर्लंड सरकारकडून (government of switzerland) पैसा ठेवणाऱ्यांची नवी यादी मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारताला सलग चौथ्या वर्षी स्वित्झर्लंडकडून नागरिक आणि संस्थांच्या स्विस बँकेतील खात्यांची माहिती देण्यात आली आहे.
स्वित्झर्लंडने भारतासह 101 देशांसोबत सुमारे 34 लाख आर्थिक खात्यांची माहिती दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत अधिकाऱ्यानी सांगितले की, शेकडो आर्थिक खात्यांशी संबंधित असलेला तपशील आता भारत सरकारबरोबर शेअर करण्यात आला आहे.
गोपनीयतेच्या कायद्याचा संदर्भ देत सविस्तर माहिती देण्यात आली नाही. मात्र या गोष्टीचा भारतातील तपासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असंही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अल्बानिया, ब्रुनेई दारुसलाम, नायजेरिया, पेरू आणि तुर्की या पाच नवीन क्षेत्रातील माहितीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
स्विस बँकेतील आर्थिक व्यवहाराबाबत 74 देशांसोबत माहितीची देवाणघेवाण झाली असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र रशियासह 27 देशांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.
स्वित्झर्लंड आता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये माहिती या बँकेतील माहिती जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर एफटीएने 101 देशांची नावं आणि इतर माहितीही उघड केली नाही.
परंतु याबाबतीत अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्विस बँकेत खाते असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या खात्यांबाबत सलग चौथ्या वर्षी हा अहवाल जाहीर करणार असून त्यामध्ये भारताताचा समावेश आहे.
