AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tahawwur Rana extradition : उद्या सकाळपर्यंत तहव्वुर राणाला आणणार भारतात

Tahawwur Rana extradition : आपलं प्रत्यर्पण रोखण्यासाठी तहव्वुर राणाने अमेरिकी कोर्टात धाव घेतली होती. पण अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने तहव्वुर राणाचा अर्ज फेटाळून लावला. मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात तहव्वुर राणाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Tahawwur Rana extradition : उद्या सकाळपर्यंत तहव्वुर राणाला आणणार भारतात
Tahawwur RanaImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 09, 2025 | 10:37 AM
Share

मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाला उद्या सकाळपर्यंत भारतात आणलं जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. राणाच्या प्रत्यर्पणासाठी भारताच्या वेगवेगळ्या एजन्सीच्या टीम सध्या अमेरिकेमध्ये आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहव्वुर राणाच्या प्रत्यर्पणासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरु आहेत. राणाला लवकरच भारताच्या ताब्यात सोपवलं जाण्याची शक्यता आहे.

तहव्वुर राणाला एक किंवा दोन दिवसात भारतात आणलं जाऊ शकतं. अमेरिकी कोर्टाच्या सल्ल्यानुसार तहव्वुर राणासाठी दिल्ली आणि मुंबईच्या तुरुंगात गोपनीय पद्धतीने सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतात आणल्यानंतर राणाला सुरुवातीचे काही आठवडे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कोठडीत ठेवलं जाऊ शकतं. हे सगळं ऑपरेशन NSA अजित डोवाल, एनआयए आणि गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होईल.

त्याच्या बाजूने सर्व प्रयत्न केले

आपलं प्रत्यर्पण रोखण्यासाठी तहव्वुर राणाने अमेरिकी कोर्टात धाव घेतली होती. पण अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने तहव्वुर राणाचा अर्ज फेटाळून लावला. मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात तहव्वुर राणाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताकडे प्रत्यर्पण होऊ नये, यासाठी तहव्वुर राणाने त्याच्या बाजूने सर्व प्रयत्न केले.

भारतात मी जास्त काळ जगू शकणार नाही

राणाने अमेरिकी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलेलं की, त्याच्या प्रत्यर्पणावर इमरजन्सी स्टे लावा. भारताकडे माझं प्रत्यर्पण झालं, तर मला त्रास दिला जाईल. भारतात मी जास्त काळ जगू शकणार नाही, असं तहव्वुर राणाने त्याच्या याचिकेत म्हटलं होतं.

तहव्वूर राणा कोण?

पाकिस्तानी लष्करात डॉक्टर असलेला तहव्वूर राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तय्यबाचा हस्तक आहे. तहव्वूर हा 11 ते 21 नोव्हेंबर 2008 या काळात भारतात होता. तसेच तो 20 आणि 21 नोव्हेंबरला मुंबईत होता. तहव्वूर राणा याने डेव्हिड कोलमन हेडली याला सहकार्य केल्याचा आरोप आहे. तहव्वूर राणा हा कॅनडाचा नागरीक आहे. तो पत्रकाराच्या हत्ये प्रकरणी अमेरिकेच्या कारागृहात आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?