AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sri Lanka Economic Crisis : आंदोलकांचा राष्ट्रपती भवनाला घेराव पंतप्रधानांचे घरही जाळले; जाणून घ्या श्रीलंकेतील आतापर्यंतच्या महत्त्वाच्या दहा घडामोडी

रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. तर गोटबाया हे 13 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. जाणून घेऊयात श्रीलंकेमधील आतापर्यंतच्या घडामोडींबाबत.

Sri Lanka Economic Crisis : आंदोलकांचा राष्ट्रपती भवनाला घेराव पंतप्रधानांचे घरही जाळले; जाणून घ्या श्रीलंकेतील आतापर्यंतच्या महत्त्वाच्या दहा घडामोडी
20 जुलैला नवा राष्ट्रपतीImage Credit source: social media
| Updated on: Jul 10, 2022 | 10:22 AM
Share

कोलंबो : सध्या श्रीलंका (Sri Lanka) एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत परिस्थिती गंभीर बनली आहे. नागरिकांचा संयम सूटू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून श्रीलंकेत जोरदार आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी शनिवारी दुपारी एकत्र येत राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातल्यानंतर राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa)यांनी आपल्या निवासस्थानातून पलायन केले. आंदोलक एवढ्यावरच थांबले नाहीत तर शनिवारी रात्री त्यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या निवासस्थाकडे कूच केली. यावेळी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करण्यात आला. त्यामुळे आंदोलक आधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांच्या घराला आग लावली. दरम्यान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. तर गोटबाया हे 13 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. जाणून घेऊयात या घडामोडींबाबत दहा मोठे मुद्दे.

दहा महत्त्वाच्या घडामोडी

  1. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे हे 13 जूलै रोजी राजीनामा देणार आहेत. याबाबत लोकसभा अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी माहिती दिली. काल याच पार्श्वभूमीवर अभयवर्धने यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती.
  2. या सर्व पक्षीय बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यातील पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. तर आपण 13 जुलै रोजी राजीनामा देणार असल्याचे राजपक्षे यांनी अध्यक्षांना पत्राद्वारे कळवले आहे.
  3. या बैठकीपूर्वी श्रीलंकन जनतेकडून देखील गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. आंदोलकांनी राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. यानंतर राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवनातून पलायन केले.
  4. दरम्यान त्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या घराकडे वळवला. आक्रमक आंदोलकांनी विक्रमसिंघे यांचे घर पेटवले.
  5. संतप्त आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन रानिल विक्रमसिंघ यांनी राजीनामा दिला आहे. तर राजपकक्षे हे 13 तारखेला राजीनामा देणार आहेत.
  6. रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेच्या आणखी दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. ज्यामध्ये हरिन फर्नांडो आणि मानुषा नानायक्कारा यांच्या नावाचा समावेश आहे.
  7. श्रीलंकेत परिस्थिती आता आणखी गंभीर बनल्यामुळे अनिश्चित कालावधीसाठी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.
  8. श्रीलंकेत कडेकोड पोलीस बंदोबस्त आहे. सैन्यदल देखील रस्त्यावर उतरले आहे. कर्फ्यू लागू केल्यानंतर देखील नागरिकांचे आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांमध्ये वाद होत आहेत.
  9. पंतप्रधानाच्या निवासस्थानाबाहेर चार पत्रकारांवर देखेली आंदोलकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
  10. श्रीलंकेकडील विदेशी गंगाजळीचा साठा प्रचंड प्रमाणात घटल्याने त्यांना वस्तू आायत करण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना कारावा लागत आहे.

Follow Us
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...