पाकिस्तान आपटला तोंडावर, मोठ अपयश, थेट इराणकडून अमेरिकेच्या..

इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता करार बैठक तोंडावर आहे. पण होर्मुज खाडीत तणाव वाढत आहे. मोठा हल्ला इराणच्या जहाजावर अमेरिकेकडून करण्यात आला. होर्मुज खाडी गेल्या काही तासांपासून पूर्णपणे ठप्प आहे.

पाकिस्तान आपटला तोंडावर, मोठ अपयश, थेट इराणकडून अमेरिकेच्या..
Iran Drone attack
| Updated on: Apr 20, 2026 | 8:48 AM

इराण आणि अमेरिका युद्धात खळबळ उडाली. युद्धबंदी दोन आठवड्यांकरिता दोन्ही देशांनी जाहीर केली. मात्र, युद्धबंदी संपण्याकरिता 3 दिवस शिल्लक असताना तणाव वाढला. अमेरिकेने इराणच्या जहाजावर अगोदर हल्ला केला आणि त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर इराण देखील आक्रमक झाला. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही उत्तर देऊ असे इराणने म्हटले. इराणच्या सैन्याने आता अमेरिकेच्या सैन्याविरोधात ओमान खाडीत जोरदार हल्ला बोलला आहे. मात्र, यावर इराणी अधिकाऱ्यांनी अजून काही भाष्य केले नाही. मिडिया रिपोर्टनुसार, ओमान समुद्रात इराणच्या सैन्याकडून अमेरिकेच्या काही जहाजांवर ड्रोन हल्ला करण्यात आला. मात्र, नक्की अमेरिकेचे किती नुकसान झाले, याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही. अमेरिकेने इराणी जहाज ताब्यात घेतल्यापासून तणाव वाढला.

मुळात म्हणजे अमेरिकेने केलेली नाकाबंदीच इराणला सहज होत नाही. कारण इराणच्या बंदरातून एकही जहाज बाहेर पडू शकल नाही. परिणामी त्यांच्या अर्थव्यवस्थेवर थेटपणे परिणाम होत आहे. मालाची आयात आणि निर्यात सर्वकाही थांबले. इराण आणि अमेरिकेमुळे होर्मुज खाडीत तणाव प्रचंड वाढला आहे. वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाली.

अमेरिकेनेही मान्य केले की, त्यांनी इराणी जहाजाविरोधात मोठी कारवाई करून त्यावर हल्ला केला आणि ते जहाज आपल्या ताब्यात घेतले. या जहाजाचे नाव तूस्का आहे. अमेरिकेच्या सैन्याने जहाजाला थांबण्यास सांगितले. पण जहाज काही थांबत नसल्याने त्याच्यावर हल्ला करून ताब्यात घेतल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. मात्र, या हल्ल्यानंतर तणाव वाढला. इराणकडून अमेरिकेच्या जहाजांवर ड्रोन हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात आहे. होर्मुज खाडी सुरक्षित व्हावी आणि जहाजांची वाहतूक व्हावी, ही जगाची मागणी आहे. पण स्थिती काही सामान्य होत नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतात एलपीजीची मोठी समस्या आहे. जर काही दिवस होर्मुज खाडीत हीच परिस्थिती राहिली तर अनेक देशांचे तीन तेरा वाजतील. भारताचे होर्मुज खाडीतील घडामोडींवर बारीक लक्ष आहे. तिथे भारताचे जहाज अडकून पडले आहेत.

Follow Us