
Narendra Modi Visits Thailand : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या थायलंडच्या दौऱ्यावर असून ते BIMSTEC च्या शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी तेथे गेले आहेत. या शिखर संमेलनात एकूण सात देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी बिमस्टेकच्या दौऱ्यावर असताना थायलंडच्या प्रतप्रधानांनी मोदी यांनी आगळीवेगळी भेट दिली आहे. या भेटीच्या रुपात भारत आणि थायलंड यांच्यातील सांस्कृतिक संबंध आणखी मजबूत झाले आहेत, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
थायलंडच्या पंतप्रधान पायतोंगर्टान शिनावात्रा यांनी नरेंद्र मोदी यांना पवित्र ग्रंथ ‘द वर्ल्ड तिपिटका : सज्जया फोनेटिक अॅडिशन’ भेट म्हणून दिला आहे. हा ग्रंथ बौद्ध धर्मात एक प्रवित्र आणि प्रमुख ग्रंथ मानले जाते. तिपिटका (पाली भाषेत) त्रिपिटक (संस्कृत भाषेत) या ग्रंथात भवान बुद्धाने दिलेल्या उपदेशाचे, शिकवणीचे संकलन करण्यात आलेले आहे.. विशेष म्हणजे या ग्रंथाचे संपूर्ण 80 खंड नरेंद्र मोदी यांना थायलंडच्या पंतप्रधानांनी भेट म्हणून दिले आहेत. या ग्रंथाला प्रमुख बौद्ध धर्मग्रंथ मानले जाते.
Narendra Modi Visits Thailand
नरेंद्र मोदी यांना भेट दिलेला ग्रंथ हा पाली आणि थाई लिपीत लिहिण्यात आलेला आहे. थायलंडच्या सरकारने 2016 साली ‘विश्व तिपिटका परियोजने’चा भाग म्हणून राजा भूमिबोल अदुल्यादेज (राम IX) आणि राणी सिरीकित यांच्या 70 वर्षांच्या शासनकाळाच्या स्मृतीप्रित्यर्थ हा ग्रंथ प्रकाशित केला होता.
Narendra Modi Visits Thailand
थायलंडच्या प्रतप्रधानांनी दिलेल्या भेटीबाबत नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधान शिनावात्रा यांनी मला त्रिपिटक हा ग्रंथ भेट म्हणून दिला. भगवान बुद्ध यांची भूमी असलेल्या भारत देशातर्फे हात जोडून मी या भेटीचा स्वीकार केलेला आहे. गेल्या वर्षी भारताने भगवान बुद्ध आणि त्यांच्या दोन प्रमुख शिष्यांचे पवित्र अवशेष थायलंडमध्ये पाठवले होते. साधारण चार दशलक्ष लोकांनी या पवित्र अवशेषांना नमन केललं आहे, हे ऐकून मला खून आनंद झाला,” अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.