BLA : तुम्ही कुठल्याही कोपर्‍यात सुरक्षित नाही, 14 सैनिक एका झटक्यात यमसदनाला, Video केला पोस्ट

Baloch Liberation Army : पाकिस्तानात यादवी माजली आहे. बलुचिस्तानातील नेत्यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी पाक लष्करावर सलग अनेक हल्ले केले आहेत. हल्ल्याच्या धास्तीने पाकिस्तानी लष्काराची चांगलीच भंबेरी उडाली आहे.

BLA : तुम्ही कुठल्याही कोपर्‍यात सुरक्षित नाही, 14 सैनिक एका झटक्यात यमसदनाला, Video केला पोस्ट
पाकिस्तान बलुचिस्तान, बलूच आर्मी
Image Credit source: गुगल
| Updated on: May 17, 2025 | 3:52 PM

पाकिस्तानाचे केव्हा पण दोन तुकडे होऊ शकतात. बलुचिस्तान लिबेरशन आर्मीने (BLA) स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र केला आहे. बलूच नेत्यांनी स्वातंत्र्याची अगोदरच घोषणा केली आहे. तर BLA ने पाक लष्करावरील हल्ले वाढवले आहे. या हल्ल्यांमुळे पाकिस्तान सैनिक ठार होत आहे. भारताविरोधात आगळीक करणारे शरीफ-मुनीर यांना बुडाखाली लागलेली ही आग विझवणे अवघड झाले आहे. बीएलएने बुलिचस्थानातील अनेक भागात ताब्यात घेतले आहेत. तिथे पाकचा राष्ट्रीय ध्वज फडकत नाही का राष्ट्रगीत वाजत नाही. हल्ल्याच्या धास्तीने अनेक पाक जवानांनी बलुचिस्तानमध्ये पोस्टिंग नकोचा धोशा लावला आहे. पाकिस्तानचे सैनिक कोणत्याच कोपऱ्यात सुरक्षित नसल्याचा थेट इशारा बलूच आर्मीने दिल्याने येत्या काळात मोठे हल्ले होण्याची शक्यता आहे.

14 पाकिस्तानी सैनिक यमसदनी

बलूच लिबरेशन आर्मीने 14 पाकिस्तानी सैनिकांना मारल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा हल्ला 9 मे रोजी बलुचिस्तानमधील पंजगुर जिल्ह्यात करण्यात आला. या हल्ल्यात पाकिस्तानी सैनिक जात असलेल्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले. BLA ने 14 मे रोजी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला चढवल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. बलूच आर्मीने पाक सैन्याविरुद्ध केलेल्या हल्ल्याला ऑपरेशन हेरोफ असे नाव दिले आहे.

तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात सुरक्षित नाही

BLA ने हल्ल्यानंतर त्याची माहिती दिली. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची लढाई आता मजबूत झाली आहे. पाकिस्तानी सैनिक बलुचिस्तानच्या कोणत्याच कोपऱ्यात सुरक्षित नाही असे बलूच आर्मीने स्पष्ट केले. बलूचमधील अनेक प्रांतातून पाक सैनिकांना हुसकावून लावण्यात आले आहे. तर काही भागात पाकिस्तानचे सैनिक चौक्या सोडून पळून गेल्याचे समोर आले आहे. बलुचिस्तानमधील सरकारी शाळा, प्रशासकीय इमारती, रुग्णालये आणि महत्त्वाच्या सरकारी कार्यालयावर बलूच आर्मीने ताबा मिळवत कामकाज सुरू केले आहे.

58 ठिकाणी 78 हल्ल्यांची जबाबदारी

BLA ने 58 ठिकाणी 78 हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. ऑपरेशन हेरोफ अंतर्गत गेल्या काही आठवड्यापासून बलुचिस्तानमधील 58 ठिकाणी 78 अचूक हल्ले केल्याचा दावा बलूच आर्मीने केला आहे. केच, पंजगूर, मस्तूंग, क्वेटा, जमुरान, तोलांगी, कुलुकी आणि नुशकी या भागात पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केल्याची माहिती बीएलएने 11 मे रोजी दिली. पाकिस्तानी सैन्य, त्यांची गुप्त ठिकाणं, स्थानिक पोलीस ठाणे यांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तान हा मानवतेला लागलेली कीड असून दहशतवादाचा गड असल्याचा दावा बीएलएने केला आहे. जागतिक समुदायाने पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.