
भारताच्या शेजारील देश बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. तिथे लोक रस्त्यावर उतरले आहेत. भारताचे महान चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या वडिलोपार्जित घराचीही तोडफोड करण्यात आली. गेल्या वर्षीही जुलैमध्ये बांगलादेशमध्ये दंगल सुरू झाली होती. ज्याचं रुपांतर तीव्र हिंसाचारात झालं होतं. ज्यामुळे शेख हसीना यांना केवळ बांगलादेशचं पंतप्रधानपदच नाही तर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देशही सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. परंतु यावेळी दृश्य थोडं वेगळं आहे. आता दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर संस्थेनंतर आता पाकिस्तानी दहशतवादी गटही बांगलादेशात घुसले आहेत. अशा परिस्थितीत, बांगलादेश पुन्हा एकदा पाकिस्तान बनण्याच्या मार्गावर आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. या प्रश्नाचं उत्तर कदाचित भविष्यात मिळेल, पण बांगलादेश निर्मितीची गरज का होती, बांगलादेश निर्मितीच्या काही महिने आधी पाकिस्तानमध्ये काय शिजत होतं, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.. ...