AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय सैन्यात लवकरच येणार ८०० किमी पल्ल्याचे ब्रह्मोस, मध्य पूर्व तणावात भारताची तयारी

मध्य पूर्वेत वाढत्या तणावाच्या आणि बदलत्या युद्धाच्या पद्धतीत भारतीय सैन्य ८०० किमी रेंजची ब्रह्मोस क्षेपणास्राची खरेदी करण्याच्या तयारीत आहे.

भारतीय सैन्यात लवकरच येणार ८०० किमी पल्ल्याचे ब्रह्मोस, मध्य पूर्व तणावात भारताची तयारी
BrahMos
| Updated on: Mar 27, 2026 | 6:12 PM
Share

पश्चिम आशियात तणाव वाढत असताना बदलत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने आपल्या लांबपल्ल्याच्या मारक क्षमतेला आणखी मजबूत करण्याच्या निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता भारतीय सैन्यदल आता आपल्या ताफ्यात ब्रह्मोस क्षेपणास्राच्या नवे ८०० किमी पल्ल्याची आधुनिक आवृत्तीचा समावेश करण्याच्या तयारीत आहे. डिफेन्स सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता भारतीय सैन्याजवळ ४५० किमीहून जास्त पल्ल्याचे ब्रह्मोस क्षेपणास्र उपलब्ध आहे. मात्र, आता भारतीय सैन्य त्याहून जास्त पल्ल्याचे नव्या पिढीच्या क्षेपणास्रांचा समावेश करु इच्छीत आहे. यामुळे शत्रूच्या मुलखात खूप खोलवर हाय व्हॅल्यू टार्गेटवर अचूक हल्ला करणे शक्य होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावावर संरक्षण मंत्रालयाच्या उच्च स्तरिय मिटींगमध्ये चर्चा होणार आहे. जर मंजूरी मिळाली तर हा ब्रह्मोसच्या एक्सटेंडेड रेंज व्हर्जनचा आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर ठरु शकते.

‘ऑपरेशन सिंदूर’ मधून मिळाला आत्मविश्वास

गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये ब्रह्मोस क्षेपणास्राची ताकद स्पष्ट दिसली होती. भारतीय सेना आणि वायू सेनेने या ब्रह्मोस क्षेपणास्राचा वापर करुन पाकिस्तानच्या अनेक एअरबेसना टार्गेट केले होते. या हल्ल्याच्या यशानंतर सैन्याचा या क्षेपणास्रावरील विश्वास वाढला आहे.

इराण, अमेरिका आणि इस्राईलच्या दरम्यान तणावामुळे हे देखील स्पष्ट झाले आहे की लांब पल्ल्याचे क्षेपणास्र आणि स्टँड ऑफ शस्रास्रे किती महत्वाची ठरु शकतात. आता युद्धात थेट जोखीम घेण्याच्या ऐवजी लांबूनच अचूक हल्ला करण्यावर जास्त जोर दिला जात आहे.

सैन्याचा फोकस लाँग रेंज आणि ड्रोन पॉवर

आता बदलत्या स्थितीत भारतीय सैन्याने लांबपल्ल्याचे क्षेपणास्रे आणि ड्रोन सिस्टीम मिळून मजबूत, नेटवर्क आधारित स्ट्राईक सिस्टीम तयार केली आहे. याचा हेतू वेगवान, अचूक आणि गरजेनुसार उत्तर देण्याची क्षमता वाढवणे आहे.

सूत्रांच्या मते सद्य स्थितीत ( मार्च २०२६ पर्यंत ) भारतीय सैन्याकडे सध्या ४५० किमी रेंजवाल्या BrahMos क्षेपणास्रांची रेजिमेंट्स आहे. ८०० किमीहून अधिक पल्ल्याच्या BrahMos-ER वेरिएंटचा विकास सुरु आहे.

यात मॉडिफाईड रामजेट इंजिन, जास्त फ्युअल क्षमता आणि चांगली नेव्हीगेशन सिस्टीम आहे. भारतीय सैन्यदल ८०० किमी व्हेरिएंटसाठी मोठी ऑर्डर देण्याच्या तयारीत आहे. संरक्षण मत्रालयाच्या उच्च स्तरिय बैठकीत लवकरच या प्रस्तावावर चर्चा आणि अंतिम मंजूरीची आशा आहे.

इंडक्शनची संभाव्य टाईमलाईन

ऑर्डर मंजूरी: २०२६ च्या आत (येत्या काही दिवसात /आठवड्यात बैठकीनंतर ).

पूर्ण विकास आणि टेस्टिंग: २०२७ च्या अखेर वा २०२८ च्या सुरुवातीला पूर्ण होण्याची आशा ( सध्या याच्या ट्रायल सुरु आहेत. ramjet अपग्रेड देखील जवळपास तयार आहे. )

इंडक्शन ( ताफ्यात सामील ) : २०२७-२८ पासून सुरु होऊ शकते.

इतका वेळ का ?

BrahMos एक जटिल सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्र आहे. (Mach 2.8-3+ वेग ). रेंज वाढवण्यासाठी एक इंजिन, फ्युअल आणि वजन ऑप्टिमायजेशनची गरज आहे.

MTCR च्या सदस्यत्वानंतर रेंज वाढवणे शक्य होणार, कारण प्रत्येक व्हेरिएंटची संपूर्ण व्हॅलिडेशन गरजेचे ( navigation accuracy, jamming resistance ) आहे.

ब्रह्मोसच्या नव्या आवृत्तीची पहिली मोठी ऑर्डर असल्याने प्रोडक्शन रँप-अप, टेस्टींग आणि डिलिव्हरीत २-३ वर्षे लागू शकतात. म्हणजे २०२८ पर्यंत सैन्याला पुरेशा संख्येत ही क्षेपणास्र मिळणे शक्य होतील. यामुळे भारत आता आपल्या सैन्य रणनितीत मोठा बदल करत दूरवरुन टार्गेटवर अचूक वारा (Stand-off Strike) वर वेगाने फोकस करु शकतो.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं