
मुंबईकर १६ डिग्री तापमान घसरले तरी घाबरत असतात. राज्याच्या अनेक भागात तापमान कमालीचे थंड आहे. कश्मीर आणि हिमाचलात बर्फाची चादर पसरली आहे.भारताच्या उत्तरेत थंडीमुळे कुडकुडत दातांचे आवाज यावेत अशी थंडी असताना तिकडे रशियात तर हाडे गोठवणारी थंडी म्हटले तरी वर्णन कमी पडेल अशी थंडी पडली आहे. गेल्या साठ वर्षांच्या इतिहासात रशियात इतकी थंडी पडली आहे.रशियाची राजधानी मॉस्को संपूर्ण गोठली असून तेथे उणे २८ डिग्री तापमान घसरले आहे.
सध्या जगात बहुतांश भागात भीषण थंडी पडलेली आहे. अमेरिका, युरोप किंवा आशियातील जनजीवन सध्या हाडे गोठवणाऱ्या थंडीने विस्कळीत झाले आहे. रशियात तर सर्वाधिक बर्फवृष्टी झाली आहे. येथे साठ वर्षांतील सर्वाधिक बर्फवृष्टी झाली आहे. शहरातील अनेक भागात अनेक मीटर उंचीचे बर्फ साचले आहेत.
आर्टीक्ट येथून येणाऱ्या बर्फाळ हवेने रशियांच्या शहरात बर्फाचे डोंगर तयार केले आहेत. राजधानी मॉस्कोत भीषण थंडी पडली आहे. येथे तापमान -28 डिग्री पर्यंत घसरले आहे. या दरम्यान सोशल मीडियावर रशियातील एका उंच रेडिओ टॉवरचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यात ही इमारत अक्षरश: कुल्फीसारखी गोठल्याचे दिसत आहे.
येथे पोस्ट पाहा –
Moscow’s extreme cold (up to -28°) has frozen the Ostankino Tower – the iconic 540-meter TV tower and one of the tallest structures in Europe. Sub-zero temperatures are no joke ❄️🥶 pic.twitter.com/fydhK6YOKr
— Russian Embassy in Kenya/Посольство России в Кении (@russembkenya) January 23, 2026
रशियात लोकांना जास्तवेळ बाहेर फिरु नका असे तेथील हवामान खात्याने म्हटले आहे. तेथील लोकांना गरम कपडे घालूनच वावरावे लागत आहे. गरम हात आणि पाय मोजे कान बंद करणारा कोट घालूनही थंडी आवरत नाही अशी स्थिती आहे. रशियात मॉस्को येथे असेच तापमान दरवर्षी उणे 28पर्यंत जात असते असे स्थानिक वेबसाईटवर म्हटले आहे. पोलर वॉर्टेक्सची कमजोरी आणि भौगोलिक रचनेमुळे रशियात शीतलहर पसरल्याचे म्हटले जात आहे.