AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Henley Passport Index 2026 : भारतीय पासपोर्टची मोठी झेप, आता इतक्या देशात व्हिसा फ्री प्रवेश शक्य

Henley Passport Index 2026 आपला शेजारी पाकिस्तानचे स्थान देखील सुधारले आहे. दहा वर्षांत प्रथमच पाकिस्तानचा पासपोर्ट टॉप- 100 मध्ये आला आहे.

Henley Passport Index 2026 : भारतीय पासपोर्टची मोठी झेप, आता इतक्या देशात व्हिसा फ्री प्रवेश शक्य
Henley Passport Index 2026
| Updated on: Jan 23, 2026 | 4:34 PM
Share

जगात फिरायला मिळणारे स्वातंत्र्य कोणा देशाच्या ताकदीचा मोठा संकेत बनू शकतो. याआधारे जारी झालेल्या Henley Passport Index 2026 च्या नव्या रँकींगने पुन्हा एकदा जागतिक ताकदीच्या संतुलनाचा आलेख सादर केला आहे. या वर्षी ही सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात ताकदवान पासपोर्ट म्हणून घोषीत केला आहे. म्हणजे ज्याच्याकडे सिंगापूरचा पासपोर्ट असेल त्या व्यक्तीला व्हिसा शिवाय १९२ देशांचा प्रवास करता येणार आहे. आशियाची वाढती ताकद या नव्या Henley Passport Index 2026 मध्ये दिसत आहे. सिंगापूर नंतर दुसऱ्या क्रमांकावर जपान आणि साऊथ कोरियाचा नंबर लागला आहे. या दोन्ही देशांच्या पासपोर्टना १८८ देशात व्हिसा फ्री एण्ट्री मिळत आहे. युरोपचे अनेक देश तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.तर संयुक्त अरब अमिराती गेल्या दोन दशकात ५७ व्या पायरीवर उडी मारत टॉप – ५ मध्ये गेला आहे. मात्र एकाच पायरीवर अनेक देश आहेत.

पासपोर्ट इंडेक्समध्ये कोणाची स्थिती कशी ?

अमेरिका गेल्या वर्षीच्या घसरणीनंतर पुन्हा टॉप-१० मध्ये परतली आहे आणि १७९ देशात व्हिसा फ्री एण्ट्रीसह १० व्या स्थानावर पोहचली आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनाडा आणि मलेशिया देखील टॉप – १० मध्ये जागा तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. याच्या उलट सर्वात कमजोर पासपोर्टच्या यादीत अफगाणिस्तान सर्वात खालच्या नंबरवर आहे. अफगाणिस्तानच्या पासपोर्टवाल्या व्यक्तीला केवळ २४ देशात विना व्हिसा प्रवेश मिळणार आहे.त्यानंतर सिरीया ( १०० व्या ), इराक ( ९९ व्या ), पाकिस्तान ( ९८ व्या ), येमन आणि सोमालिया सारखे देश आहेत. रिपोर्टनुसार आज सर्वात मजबूत आणि सर्वात कमजोर पासपोर्टच्या दरम्यान १६८ देशांचे अंतर झाले आहे. साल २००६ मध्ये हे अंतर केवळ ११८ देशांचे होते.

पाकिस्तानाठी गुड न्यूज आली ?

पाकिस्तान ९८ व्या रँकमध्ये येऊन टॉप १०० मध्ये येण्यास यशस्वी झाला आहे. गेल्यावर्षी पाकिस्तान १०३ क्रमांवर होता. १० वर्षात पहिल्यांदा पाकिस्तान टॉप – १०० मध्ये आला आहे. रँकींग सुधारुनही पाकिस्तानच्या पासपोर्टने जास्त देशात व्हिसा फ्री जाता येत नाही. गेल्यावर्षी १०३ व्या क्रमांकावर असूनही पाकिस्तान पासपोर्टधारक ३३ देशाचा व्हिसा फ्री प्रवास करु शकतात. यावर्षी पाकिस्तानची रँक सुधारुन ९८ होऊनही त्याच्या पासपोर्टला ३१ देशांत व्हिसा फ्री प्रवेश आहे.म्हणजे उलट २ देश कमी झाले आहेत.

जागतिक पासपोर्टची क्रमवारी –

रँकींग देशाचे नाव किती देशात व्हिसा फ्री प्रवेश
1सिंगापूर 192 देश
2जापान, साऊथ कोरिया188 देश
3डेन्मार्क, लक्झमबर्ग, स्पेन, स्वीडन, स्विर्त्झलँड186 देश
4ऑस्ट्रिया, बेल्झियम, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयरलँड, इटली, नेदरलँड, नॉर्वे185 देश
5हंगेरी, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्लोवेनिया, यूएई184 देश
6क्रोएशिया, चेकिया, एस्टोनिया, माल्टा, न्यूझीलंड, पोलँड 183 देश
7ऑस्ट्रेलिया, लातविया, लिकटेंस्टाईन, यूनायटेड किंगडम 182 देश
8कॅनडा, आइसलँड, लिथुआनिया181 देश
9 मलेशिया 180 देश
10अमेरिका179 देश

भारताची काय स्थिती ?

भारताचे साल २०२६ मध्ये Henley Passport Index 2026 मध्ये ८० वे स्थान गाठले आहे. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच पायऱ्यावरती आहे. २०२५ मध्ये भारत ८५ व्या रँकवर होता. भारतीय पासपोर्ट धारकांना आता ५५ देशात व्हिसा फ्री वा व्हिसा ऑन अरायवल सुविधा मिळत आहे. ही सुधारणा भलेही छोटी असली तर यास सकारात्मक संकेत मानला जात आहे.

बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.