AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅलिफोर्नियातून चोरीला गेलेला शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर सापडला, अमेरिकेच्या एका गोदामात आढळला, तेथे कसा काय गेला ?

अमेरिकेच्या उत्तर भागातील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा गेल्या जानेवारी महिन्यात चोरीला गेला होता. हा पुतळा एका गोदामात अखेर सापडला आहे.

कॅलिफोर्नियातून चोरीला गेलेला शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर सापडला, अमेरिकेच्या एका गोदामात आढळला, तेथे कसा काय गेला ?
chhatrapti shivaji maharajImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 15, 2023 | 3:09 PM
Share

दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांचा कॅलिफोर्नियामधून जानेवारी अखेरीस चोरी गेलेला पुतळा अखेर सापडला आहे. अमेरिकेच्याच जुन्या सामानाच्या गोदामात तो आढळून आला आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया स्थित सॅन जोस शहरातील उद्यानातून या पुतळ्याला 31 जानेवारीस कोणी तरी अज्ञाताने चोरी केल्याने खळबळ उडाली होती. आता हा पुतळा एका गोदामात सापडला आहे. हा पुतळा गोदामापर्यंत कसा पोहचला याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहेत.

सॅन जोस शहरातील एका पार्क मधून गेल्या महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी झाली होती, आता तो ज्या गोदामातून जप्त करण्यात आला आहे तो परिसर अवैघ कामसाठी ओळखळा जात असतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा अशा परिसरात सापडणे म्हणजे त्याची चोरी अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांच्या टोळीनेच केली असावी असे म्हटले जात आहे. हा पुतळा अमेरिकेच्या उत्तर भागातील शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा होता. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार हा पुतळा पुणे शहराने 1999 मध्ये कॅलिफोर्निया भेट म्हणून दिला होता. त्यास जानेवारी महिन्यात अज्ञातांनी चोरले होते.

पुतळ्याचे वजन 200  किलो 

या पुतळ्याचे वजन सुमारे 200  किलो आहे, त्यास धातूपासून बनविण्यात आलेले आहे. याची किंमत जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, पोलीसांना त्याचा शोध लागल्यानंतर त्याला गोदामातून हस्तगत केले आहे. आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील गोदामाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. परंतू कोणावलाही अजून आरोपी ठरविण्यात आलेले नाही, सॅन जोसचे महापौर मॅट माहन यांनी म्हटले आहे हा पुतळा आमच्या भारतीय समुदासाठी खूपच मुल्यवान आहे, जो आमच्याही गौरवाचा प्रतिक आहे, मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आम्हाला मन्मान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?