Pakistan : ज्याला शैतान म्हटलं त्या पाक खासदाराकडून लेटेस्ट बायकोचे फोटो शेअर, तेही तरुणासोबत!

घटस्फोटाशिवाय दानियाने आमिरवर फॅमिली कोर्टात अनेक केसेस दाखल केल्या आहेत. दानियाने तिच्या याचिकेत आमिरला मेहर, घर आणि दागिने, 11.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्याचे आदेश द्यावेत, अशी शिफारस न्यायालयाकडे केली आहे.

Pakistan : ज्याला शैतान म्हटलं त्या पाक खासदाराकडून लेटेस्ट बायकोचे फोटो शेअर, तेही तरुणासोबत!
पीटीआय पक्षाचे खासदार आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट आमिर लियाकतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 3:47 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानातील (Pakistan) पीटीआय पक्षाचे खासदार आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट आमिर लियाकतचे (Aamir Liaquat) तिसरे लग्नही वादात सापडले आहे. दानियाने आमिरकडून घटस्फोट मागितला असून त्यासाठी तिने न्यायालयात अर्जही दाखल केला आहे. यानंतर आमिरने इंस्टाग्रामवर (Instagram) दानियाला अनफॉलो केले. आणि एकापाठोपाठ एक व्हिडिओ टाकले आहेत. आमिरने या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याच्यापेक्षा 31 वर्षांनी लहान असलेल्या दानियासोबत तिसरे लग्न केले होते. दोघांच्या लग्नाने त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. मात्र, लग्नाच्या 4 महिन्यांतच त्यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. घटस्फोटाचा अर्ज दाखल करताना दानियाने म्हटले आहे की, आमिर पूर्वीसारखा टीव्हीवर दिसत नाही. तो सैतानापेक्षा वाईट आहे.

तो सैतानापेक्षा वाईट

मीडियाला दिलेल्या मुलाखतीत दानिया म्हणाली की, ‘याने माझ्यावर खूप अत्याचार केले आहेत. त्याने मला काही दिवस खोलीत कोंडून ठेवले. जेवणही वेळेवर दिले नाही. मी रात्रभर जागे राहायचे. मी लहान आहे, माझे इतके वय ही नाही. तो माझा अपमान करायचा. नोकरी किंवा माध्यमांतील छोटीशी चर्चा त्याला वाईट वाटायची आणि तो माझ्याशी वाद घालायचा. यामध्ये त्याने मला गोळ्या घालण्याची धमकीही दिली. तर माझा गळा दाबत मला मारले ही होते. कुठल्यातरी गुन्ह्यासाठी मला शिक्षा मिळत असल्याचे मला वाटत आहे. उद्या मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झालं तर त्याला आमीर लियाकत जबाबदार असेल.

लियाकतही उघडपणे बचावात उतरला

त्याचवेळी आमिर लियाकतही उघडपणे बचावात उतरला आहे. त्याने एका मुलासोबतची दानियाची ऑडिओ टेप लोड करत पोस्ट लिहिली आहे. ज्यात तो म्हणतो की, अल्लाह आणि त्याच्या रसूलला साक्षीदार बनवून कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर मी माझ्या बचावात नक्कीच उत्तर दाखल करेन. तर आपल्या एका इंस्टाग्राम स्टोरीवर पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीचे कौतुक करताना आमिर म्हणाला, ‘मी त्यांच्यापासून घटस्फोट घेतलेला नसला तरी दोघीही सभ्य होत्या. त्यांनी माझी छवी अशा प्रकारे खराब केला नाही. लियाकतने सांगितले की, त्याच्या पहिल्या दोन पत्नींनी आधी त्याचे नाव त्यांच्या नावावरून काढून टाकले आणि नंतर घटस्फोट मागितला. दानियावर टीका करताना लियाकतने लिहिले की, ‘तू एवढी धाडसी आहेस की वयाच्या 15 व्या वर्षी घटस्फोट घेत आहेस, आता मी तुला अनफॉलो करतोय.’

हे सुद्धा वाचा

दानियाने अनेक केसेस दाखल केल्या आहेत-

घटस्फोटाशिवाय दानियाने आमिरवर फॅमिली कोर्टात अनेक केसेस दाखल केल्या आहेत. दानियाने तिच्या याचिकेत आमिरला मेहर, घर आणि दागिने, 11.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्याचे आदेश द्यावेत, अशी शिफारस न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 7 जून रोजी होणार आहे.

लग्न होते चर्चेत-

49 वर्षीय आमिर 18 वर्षीय दानिया शाहसोबत लग्न केल्यानंतर बराच काळ चर्चेत होता. दोघांचे रोमँटिक व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. लग्नानंतर काही दिवस दोघेही मीडियात चर्चेचा विषय होते आणि एकमेकांचे खुलेपणाने कौतुक करत होते. अनेकदा दोघेही अशा पोस्ट टाकायचे ज्यात ते एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसायचे. दोघांच्या वयातील अंतर आणि प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतींवरही अनेक मीम्स बनवण्यात गेल्या आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.