Heat Red Alert : जगात भयानक उष्णता वाढणार, ऑक्सफोर्डने दिला इशारा, भारतात काय होणार ?

या क्षणी जगातील अनेक देशात थंडीने कहर केला आहे. हाडे गोठवणाऱ्या थंडीने लोकांचे प्राण जात आहेत. त्यात आता ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी एक अहवाल सादर केला असून त्यानुसार भीषण उन्हाळा येत्या काही वर्षात पडणार आहे.या अहवालात भारताचे ही भाकित केले गेले आहे.

Heat Red Alert : जगात भयानक उष्णता वाढणार, ऑक्सफोर्डने दिला इशारा, भारतात काय होणार ?
Heat Red Alert For India
| Updated on: Feb 01, 2026 | 8:39 PM

लंदन:जगात अनेक ठिकाणी हाडे गोठवणारी थंडी पडली आहे. परंतू आता उन्हाळ्यात देखील भयंकर उष्णता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ताज्या संशोधनातून नवीन माहिती उघड झाली आहे. 2026 चा नवा धोकादायक रिपोर्ट जारी झाला आहे. साल 2050 पर्यंत जगातील 40 टक्के लोकसंख्या म्हणजे जवळपास 4 अब्ज लोक अशा उष्णतेला झेलण्यास मजबूर होतील. हे तापमान सहन करणे मनुष्यांच्या क्षमते पलिकडे आहे. या अहवालात भारतासाठी देखील इशारा देण्यात आला आहे. असा उन्हाळा येणार आहे की पृथ्वीचे पाणी उकळण्याची वेळ येणार आहे.

भारतात काय होणार ?

ऑक्सफोर्डच्या संशोधकांच्या मते भारतासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. अहवालानुसार भारत, नायजेरिया आणि इंडोनेशिया त्या देशात सर्वात पुढे आहे जेथे उष्णता सर्वात भयानक रुप धारण करणार आहे. असा दावा केला जात आहे की पारा 45 ते 50 डिग्री सेल्सियस पार करणार आहे. त्यामुळे मानवाचे शरीराच्या अवयवयांना आतून थंड ठेवणे अशक्य होणार आहे. भारतातील कोट्यवधीची लोकसंख्येकडे एअर कंडीशनिंगसारखी सुविधा नाही.तसेच सुरक्षित घरे नाहीत त्यामुळे गरीबांची अवस्था अत्यंत बिकट होणार आहे. संशोधकांनी दावा केला आहे की येणाऱ्या दशकात उकाड्याने होणाऱ्या मृत्यूंची संख्येत एक प्रकारची सुनामी येण्याची शक्यता आहे.

2010 मध्ये केवळ 1.5 अब्ज लोक या संकटात होते, परंतू 2050 पर्यंत ही संख्या दुप्पट होणार आहे. आपण एका अशा वातावरणाकडे जाणार आहोत ज्याची ओळख केवळ आग आणि धुर असणार आहे.

घरे गॅस चेंबर होतील

तुम्हाला वाटत असेल की या उकाड्यापासून रशिया, कॅनडा वा फिनलँड सारखे थंड देश सुरक्षित आहे, तर ही तुमची मोठी चुक आहे.कारण या देशात घरे गर्मी शोषणासाठी आणि थंडीपासून बचावासाठी तयार केलेली आहेत. त्यामुळे जसजसे तापमानात वाढ होईल तसतसे ही घरे गॅस चेंबरमध्ये परिवर्तित होतील. येथील वाहतूक आणि आरोग्य यंत्रणा भीषण उष्णतेसाठी तयार नाही.

मोठ्या प्रमाणावर स्थलांतर

ऑक्सफोर्डच्या संशोधक राधिका खोसला यांनी सावधान करताना सांगितले की 1.5 डिग्रीची सीमा मर्यादा पार होताच. आरोग्य आणि शेती सर्वकाही नष्ट होऊन जाईल. अन्न आणि पाण्याचे संकट येईल. पिके एकतर जळतील किंवा पाण्यावाचून मरतील. कोट्यवधी लोक रहाण्या लायक जागा शोधण्यासाठी त्यांची घरे सोडतील. मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडून येईल.