युक्रेनची अडमुठी भूमिका, रशियाने दाखवला हिरवा झेंडा, अमेरिकेचा संताप, थेट राष्ट्राध्यक्षालाच…

Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसतोय. दूर दूरपर्यंत या युद्धाची झळ पोहोचतंय. शेवटी हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने प्रस्ताव दिला. महत्वाचे म्हणजे रशियाने लगेचच अमेरिकेचा प्रस्ताव मान्य असल्याचे सांगितले. मात्र, युक्रेनच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत.

युक्रेनची अडमुठी भूमिका, रशियाने दाखवला हिरवा झेंडा, अमेरिकेचा संताप, थेट राष्ट्राध्यक्षालाच...
Russia Ukraine war
| Updated on: Nov 22, 2025 | 8:55 AM

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसतोय. जग दोन भागांमध्ये विभागले गेले. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे म्हणून लावला. हेच नाही तर रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादताना अमेरिका दिसतंय. जोपर्यंत जगातील काही देश रशियासोबत व्यापार करणे थांबवणार नाहीत, तोवर युक्रेन रशिया युद्ध थांबणार नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्यामध्येच युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने शांतता योजना तयार केलीये. या शांतता योजनेला रशियाने हिरवा झेंडा दाखवला आहे. मात्र, युक्रेनचे अध्यक्ष अडमुठी भूमिका घेत आहेत. यादरम्यान अमेरिकेने अत्यंत मोठा इशारा युक्रेनला दिला.

युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि गुप्तचर पुरवठा थांबवण्याची धमकी अमेरिकेने दिली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला शांतता योजनेला मान्यता देण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, त्यांना जवळजवळ चार वर्षांचा रक्तपात थांबवायचा आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शांतता योजना नाकारली आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या हितासाठी ही योजना नाहीये. तो म्हणाला की, युक्रेनशी विश्वासघात करू शकत नाही.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेच्या शांतता करारावर बोलताना म्हटले की, युक्रेन सध्या त्याच्या सर्वात वाईट काळातून जात आहे. एकतर अभिमान आणि स्वातंत्र्य सोडावे लागेल किंवा अमेरिकन पाठिंबा गमावावा लागेल. युक्रेनच्या उच्च अधिकाऱ्यांनी अमेरिकेची शांतता योजना स्वीकारण्यास नकार दिला.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेच्या शांतता योजनेबद्दल बोलताना म्हटले की, रशियाला अमेरिकेच्या शांतता योजनेचा मसुदा मिळाला आहे. ही योजना अंमलात आणल्यास युक्रेनमधील युद्ध संपुष्टात नक्कीच येऊ शकते आणि तेथे कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होईल. रशियाने जरी ही शांतता योजना मान्य केली असली तरीही युक्रेन मात्र दाद देत नाही. अमेरिकेने ही शांतता योजना मान्य करण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. हेच नाही तर थेट धमकी देत अमेरिकेने एक संदेश वोलोदिमिर झेलेन्स्की यांना पाठवलाय.